प्रत्येक भाऊ बहिण कितीही एकमेंकासोबत भांडले, तरी जेव्हा केव्हा दोघांपैकी एक जरी अडचणीत आला की मग स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता ते एकमेकांच्या मदतीला धावतात. मायेची ऊब देणारं हे नातं, सुंदर असं निखळ प्रेमाचं नातं असतं. बहिणीच्या मनातले भावना भावाला न सांगता कळतात. मग तो भाऊ मोठा असो वा मग चिमुकला. अशाच एका गोड बहीण भावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ट्रॅम्पोलिनवर खेळताना दिसून येत आहे. तिचा भाऊ ट्रॅम्पोलिनच्या खाली दिसतोय. या इवल्याश्या मुलीला ट्रॅम्पोलिनच्या खाली यायचं असतं. पण ते उंच असल्यामुळे तिला खाली यायला जमत नाही. हे पाहिल्यानंतर तिच्या भावाने एक अशी शक्कल लढवली की ते पाहून तुम्ही या दोघा बहीण भावाच्या प्रेमात पडाल. या बहिणीची समस्या भावाने एका चुटकीसरशी सोडवली. बहिणीला खाली उतरवण्यासाठी या व्हिडीओमधला भाऊ चक्क गुडघ्यावर खाली बसतो. बहिणीला आपल्या पाठीवर पाय ठेवून खाली उतरता यावं यासाठी मदत करणाऱ्या या चिमुकल्या भावाने लाखो लोकांचं मन जिंकलं आहे.

आणखी वाचा : अरे देवा! मुलाला स्विमिंग शिकवत होती, अन् स्वतःचंच हसं करून घेतलं, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ स्पोर्ट्स सेंटर नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. बहीण-भावाच्या या गोंडस व्हिडीओने सर्वांना भावूक करून सोडलंय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण आपल्या बालपणीतल्या दिवसांची आठवण काढत आपल्या वेगवेगळ्या भावना शेअर करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : किली पॉल आणि बहीण नीमा यांच्यावर सुद्धा अली जफरच्या ‘झूम’ची नशा, नवीन VIRAL VIDEO पाहिला का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माणूसकी अजुनही जिवंत! कारखाली अडकलेल्या बाईक चालकाच्या मदतीला लोकांची गर्दी

मोठ्या भावाने लहान बहिणीला ज्या प्रकारे मदत केली त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘हे दृश् खूप सुंदर आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मोठ्या भावाने आपली जबाबदारी पार पाडली.’