सोशल मीडियावर लग्न संमारंभातील मनोरंजक आणि लग्नात वधू-वराचे धमाल करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत.लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. नवरी आणि नवरदेव अतिशय उत्साहाने नाजत-गाजत आपला हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. लग्न म्हटलं की, धमाल मस्ती करणं आणि त्या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेणे, पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा आनंद फार काळ टिकला नाही. काहीवेळा लग्नसमारंभादरम्यान अशा घटना घडतात, ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  नवरदेव वरात घेऊन नवरीच्या दारात आला.  त्याच्या स्वागतासाठी नवरी मुलीकडचे सगळे जमले होते मात्र तितक्यात नवरदेवासोबत जे भयंकर घडलं. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. यावेळी नवरदेवासोबत असलेले नातेवाईक आणि वऱ्हाडी सर्वजण घाबरले होते. लग्न म्हंटलं की फोटोसेशन आलंच, मात्र हल्ली लग्नात फोटोग्राफरपेक्षा नातेवाईकच वधु-वराचे फोटो काढण्यासाठी पुढे असतात. यावेळीही असंच घडले. नवरदेवाला आपल्या कॅमेऱ्यातही टिपण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. असंच या लग्नाचा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना एक तरुण कठड्यावर दिसतो आहे. व्हिडीओ शूट करताना हा तरुण एका दगडावर मोबाईल ठेवतो. तोच दगड अचानक खाली कोसळतो आणि थेट नवरदेवावर पडतो. नवरदेवाच्या डोक्यावर दगड पडताना दिसतो. तो तसाच जमिनीवर कोसळतो.  तिथं असलेले सर्व लोक घाबरतात. एकच खळबळ उडते. सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागतात. 

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: जंगलात दिसला महाकाय अजगर, अन् तितक्यात…थरारक Video पाहून येईल अंगावर काटा

एका हौशी फोटोग्राफरकडून मोबाईलवर शूटिंग करण्याच्या नादात मोठी चूक झाली, जी नवरदेवाला भारी पडली. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video big stone fell on groom in wedding srk
Show comments