Chota pudhari Old Video: सध्या महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ हा रिअॅलिटी कार्यक्रम खूप चर्चेत आहे. त्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या सीझनमध्ये रील स्टार सूरज चव्हाणपासून दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांसारख्या विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना स्पर्धक म्हणून निवडण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठमोठ्या भाषणांमुळे चर्चेत असणारा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेलादेखील निवडण्यात आले आहे. सध्या घनश्यामचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्या व्हिडीओमुळे तो एकेकाळी खूप चर्चेत आला होता.
‘बिग बॉस मराठी सीझन ५’ सुरू झाल्यापासून या कार्यक्रमातील १६ स्पर्धकही खूप चर्चेत आले. त्यामुळे या स्पर्धकांचे अनेक जुने व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत. जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत यांसारख्या काही कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी युजर्सही खूप उत्सुक असतात. दरम्यान, घनश्याम दरवडेचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय; ज्यामुळे त्याची छोटा पुढारी म्हणून ओळख निर्माण झाली.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घनश्याम दरवडे एखाद्या नेत्याप्रमाणे भरउन्हात मीडियासमोर आपले मत मांडत असून, त्यावेळी त्याने डोक्यावर गांधी टोपी अन् पोषाखही पुढाऱ्याप्रमाणे घातलेला दिसत आहे. यावेळी घनश्याम गावातील पाण्याच्या समस्येबाबत मीडियाला माहिती देत, राजकीय नेत्यांना आव्हान देत आहे. त्याशिवाय त्याच्यासह त्याच्या गावातील गावकरीदेखील उभे असल्याचे दिसत आहे. घनश्यामच्या याच बेधडक आणि स्पष्ट व्यक्तव्यामुळे अनेक जण त्याला ‘छोटा पुढारी’ म्हणू लागले.
हा व्हिडीओ घनश्यामच्या @ochota_pudhari_fc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १.४ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ५० हून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: अरे देवा! रील बनवता बनवता दोन बहिणींमध्ये झाली मारामारी; VIDEO पाहून युजर्सला आलं हसू
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने लिहिलेय, “याचं वय काय आहे नक्की?” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आज तो महाराष्ट्रात नेतृत्व करतोय. keep growing घनश्याम.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “छोटे पुढारी महाराष्ट्रातील लाडके पुढारी घनश्याम दरवडे.” चौथ्या युजरने लिहिलेय, “भावा, निक्कीकडे नाही; स्वतःकडे लक्ष दे सध्या.”