बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येथील एका मोबाईल चोराला धावत्या ट्रेनमधील प्रवाशाच्या हातातील मोबाईल चोरण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला. खिडकीमधून हात घालून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं. चोराचा हात ट्रेनमधील प्रवाशांनी पकडला त्याचवेळी ट्रेन सुरु झाली. त्यानंतर तब्बल १५ किलोमीटरपर्यंत हा चोर अशाचपद्धतीने खिडकीला लटकला होता.

मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराचा हात प्रवाशाने पकडल्यानंतर अन्य एका प्रवाशाने या चोराचा हात जोर लावून खेचला. त्यामुळे चोर खिडकीला लटकला. चोर माफी मागत मला सोडून द्या असं सांगत असतानाच ट्रेन सुरु झाली आणि फलाट सोडून पुढे गेली. त्यामुळे या चोराला धड आतही येता येत नव्हतं आणि पडला तर त्याच्या जीवाला धोका पोहचेल म्हणून सोडूनही देता येत नव्हतं. म्हणूनच चोराला अद्दल घडवण्यासाठी पुढील स्थानकापर्यंत त्याला प्रवाशांनी अशाच पद्धतीने खिडकीला लटकवत नेलं. अन्य प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Metro fight between two women abuses each other in delhi metro viral video on social media
आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”

या ट्रेनमधील प्रवाशांनी बेगुसराय जिल्ह्यामधील साहेबपूर कमाल स्थानकापासून खागरीया स्थानकापर्यंत अशाच प्रकारे लटकत नेलं. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबपूर कमाल स्थानकामधून गाडी निघाली आणि हळूहळू पुढे जाऊ लागली त्याचवेळी या चोराने खिडकीतून हात टाकून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. फलाट संपतो त्या ठिकाणी हा प्रयत्न चोराने केला. मात्र सजग प्रवाशाने त्याचा हात पकडला. त्या या प्रवाशाच्या मदतीला इतर प्रवासीही धावले आणि त्यांनी चोराचा दुसरा हातही पकडला.

व्हायरल व्हिडीओमध्ये खिडकीबाहेर लटकलेला हा चोर माफी मागताना दिसत आहे. माझा हात तुटेल किंवा माझा जीव जाईल असंही तो म्हणताना दिसत आहे. कृपा करुन माझा हात सोडू नका अशी विनंती हा चोर प्रवाशांना करत आहे.

पुढील स्थानकावर या चोराला प्रवाशांनी खागरीया येथील जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या चोराचं नाव पंकज कुमार असं असून तो साहेबपूर कमाल येथील पोलीस स्थानक परिसरातील रहिवाशी असलयाची माहिती समोर आली आहे.