Viral Video: नवीन शहरात गेल्यावर अनेक जण तिथल्या लोकांना पत्ता विचारतात. लोक माणुसकीच्या नात्याने त्यांची मदतही करतात. पण, कधी कधी पत्ता विचारण्यासाठी आलेली व्यक्ती ही पत्ता विचारणारी नसून चोर निघते. समोरच्या व्यक्तीने दाखवलेली माणुसकी विसरून त्याचा घात करते. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, ज्यात कधी अशा भामट्यांनी पत्ता, वेळ विचारण्याचे कारण सांगून समोरच्याच्या हातातील मोबाइल किंवा गळ्यातील सोन्याची चेन खेचून घेतली असेल. अशा लोकांमुळे हल्ली लोक खरंच गरज असलेल्या व्यक्तीलाही मदत करण्याआधी १० वेळा विचार करतात.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपला थरकाप उडतो. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी असून तिच्या जवळ आणखी एक व्यक्ती येऊन उभी राहते आणि बाईकवर बसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये एक पेपर देऊन पेपरवरील पत्ता विचारते. त्यानंतर ती व्यक्ती बाईकवर बसलेल्या व्यक्तीकडून पेपर काढून घेते आणि त्या व्यक्तीला त्याच्या खिशातील मोबाईल, पर्स द्यायला सांगते. यावेळी बाईकवर बसलेली व्यक्ती तो सांगेल त्याप्रमाणे त्याला मोबाईल, पर्स आणि नंतर त्याची बॅगही देते. त्यानंतर हे सर्व सामान घेऊन ती व्यक्ती बाईकचालकाला बाय बाय असं म्हणत तिथून निघून जाते.
पत्ता विचारण्याचे कारण देऊन जवळ आलेल्या त्या व्यक्तीने बाईकचालकावर भूल घातल्याचे म्हटले जात आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक व्यक्तींवर असे भामटे भूल घालतात, ज्यामुळे समोरची व्यक्ती त्याच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू काढून देते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @astrologybyprianca या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “भयानक टेक्निक आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बापरे हे खरं आहे का?”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “सावध रहायला हवं अशा लोकांपासून.”