आजकाल प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ आणि त्यांचे निष्पाप कृत्ये सर्वांनाच पाहायला आवडतात. प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा खळखळून हसाल. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला जमिनीवर झोपून कानात इअरबड घालून गाण्याचा आनंद घेताना दिसतेय. बाजूने एक पक्षी तिच्या जवळ येतो आणि महिला गाण्यात रमली असताना हळूच हा पक्षी तिच्या कानातले इअरबड चोरून नेतो. आपले इअरबड कुणीतरी चोरतंय याची चुणूक या महिलेला लागली आणि झोपेतून उठली. झोपेतून उठल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपले इअरबड कुण्या माणसाने नव्हे तर पक्ष्याने चोरीला नेले आहेत. 

हा पिवळ्या रंगाचा पक्षी चोचीत इअरबड पकडून उडून जातो. हे पाहून महिला आश्चर्यचकित होते. ही महिला या पक्ष्याकडून इअरबड परत घेण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवते. इतकंच काय तर त्या बदल्यात ही महिला पक्ष्याला केळी देखील देऊ करते. पण पक्षी काही ते इअरबड परत करायला तयार होत नाही.

आणखी वाचा : फुग्यासारखा फुगणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय का? हा VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळकरी मुलीने ‘सामी-सामी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, रश्मिकाही झाली फिदा

हा व्हिडीओ सुरूवातीला टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर होऊ लागला. हा व्हिडीओ २९ ऑक्टोबर रोजी रेडिटवर शेअर करण्यात आला होता आणि या व्हिडीओला ६४९ अपव्होट्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. 

Story img Loader