Viral Video: विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधक विरुद्ध सत्ताधारी रणांगणात उतरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं ठिकाण असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ५० खोके, गद्दार अशा घोषणा आपणही ऐकल्या असतील. आमदारांच्या प्रवेशापासून ते विभांभावनातून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मोठं प्लॅनिंग असतं हेच यावरून लक्षात येतं. अशीच एक लक्षवेधी एंट्री राजस्थानच्या विधानसभेत पाहायला मिळाली. भाजप आमदार सुरेश सिंह रावत लंपी आजाराचे गांभीर्य पटवून देण्यासाठी राजस्थान विधानसभेत चक्क गायीसह दाखल झाले. या गायीला सांभाळताना नंतर आमदारांच्या कार्यकर्त्यांना जी मेहनत करावी लागलीये ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
मागील काही दिवसात देशभरात लंपी या व्हायरसने शेकडो गुरे मृत पावली आहेत. अद्याप लंपी या चर्मरोगावर काहीही उपाय सापडला नसल्याने बळीराजाची चिंता वाढत आहे. अशातच या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रावत एका गायीला घेऊन विधानसभेत दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी विधानसभेच्या आवारातच पत्रकारांशी संवाद साधला. “गायींना चर्मरोगाने ग्रासले आहे, परंतु राज्य सरकार गाढ झोपेत आहे. रावत म्हणाले, “लंपी रोगाकडे लक्ष वेधण्यासाठी मी विधानसभेत गाय आणली आहे.”
Video: भर रस्त्यात खड्ड्यात उतरून केलं लग्नाचं फोटोशूट; नवरीचा भन्नाट लुक होतोय Viral
इथे रावत एकीकडे गोमातेच्या संरक्षणाची वार्ता करत असताना तिथे गोमातेला कारकर्त्यांनी दोरी बांधून धरून ठेवले होते. गायीला या बंधनाचा असा काही राग आला की तिने मान हलवून दोरी सोडायचा प्रयत्न केला, आणि संधी मिळताच गाय तिथून पळून जाऊ लागली. या गायीच्या अंगावर लंपी व्हायरसच्या विरुद्ध घोषणा देणारे पोस्टर चिकटवण्यात आले आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि मग काहीच क्षणात सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होऊ लागला. मग काय रावत यांच्या या खेळावर काँग्रेसनेही कडाडून टीका केली आहे. काँग्रेसच्या गोविंद सिंग दोतसरा यांच्यावर प्रतिक्रिया देताना रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या असंवेदनशील सरकारवर गायही संतापली आहे.
गाय गेली पळून, व्हायरल व्हिडीओ
ही घटना बघून जरी मजेशीर वाटत असली तरी लंपीमुळे देशातील पशूंची बिकट अवस्था झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५९,०२७ गुरे त्वचेच्या आजाराने दगावली आहेत आणि १३,०२,९०७ गुरे बाधित झाली आहेत.