similarities between Chinese and Indian general train coaches : देशभरामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. १.४५ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाचे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन ही भारतीय रेल्वे आहे. भारतीय रेल्वेच्या हजारो गाड्या कोटीहून अधिक प्रवाशांसह विविध मार्गावर धावतात. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये दिसणारी प्रवाशांची गर्दी सामान्य गोष्ट आहे. भारतीय रेल्वेच्या डब्यांमध्ये खचाखच गर्दी, बसायला जागा नाही, लोक जागा मिळेल तिथे झोपतात अगदी शौचालयाजवळही झोपतात अशी अवस्था दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतीय रेल्वेची जी अवस्था आहे तीच अवस्था चीनमधील ट्रेनची देखील आहे. एका भारतीय यूट्यूबरने अलीकडेच भारतीय ट्रेन आणि चीनमधील ट्रेनच्या सामान्य डब्यांची तुलना करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

भारतीय YouTuber ला चिनीच्या ट्रेनमधील जनरल क्लास आणि भारतीय रेल्वेच्या जनरल क्लासची अवस्था सारखी असल्याचे आढळले. फरक एवढाच आहे की, चीन रेल्वेमध्ये एसी आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. हा व्हिडिओ भारतीय यूट्यूबर नोमॅड शुभमने रेकॉर्ड केला आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओला जवळपास एक लाख पेक्षा व्ह्यूज आहेत आणि हजारो कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम

व्हायरल व्हिडिओमध्ये यूट्यूबरने चीनमधील ट्रेनच्या जनरल डब्याची परिस्थिती दाखवली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये चीन ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत आहे. अनेक प्रवासी अक्षरश: जमिनीवर बसलेले दिसत आहेत. अनेकजण बाथरूममध्ये बसलेले किंवा दरवाज्यामध्ये रस्ता अडवून बसल्याचे दिसले. जमिनीवर बसलेल्या आरक्षणाशिवाय प्रवासी देखील दिसत आहेत. एवढंच नाही तर एक प्रवासी थेट सीटखाली झोपला होता. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा –जंगलात हरवलेलं मांजर १२८८ किलोमीटर प्रवास करून परतलं घरी! वाचा, नक्की काय घडलं?

YouTuber ने चीन आणि भारतातील गाड्यांच्या स्थितीतील दोन प्रमुख फरक देखील सांगितले. पहिला सामान्य डब्यांमध्ये वातानुकूलित सुविधा(एसी) आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चीन ट्रेन आणि भारतीय रेल्वेमधील आणखी फरक सांगितले.

हेही वाचा – पुण्यातील रिक्षाचालकांची हद्दचं झाली रावं! रिक्षा चालवताना घडलं असं काही जे पाहून पुणेकरांना आवरेना हसू, पाहा Viral Video

सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी एकाने चीनमधील जनरल कोच ट्रेनच्या स्वच्छतेवर प्रकाश टाकला आणि लिहिले, “पण तरीही जमिनीवर एकही रॅपर किंवा कचरा पडलेला नाही, सर्व काही स्वच्छ आणि कोणीही गुटखा खाऊन थुंकत नाही.”

“चीनची दुसरी बाजू भारतापेक्षा वाईट आहे,” अशी कमेंटही एकाने केली.

“या चायनीज जनरल क्लासच्या गाड्या त्यांच्या भारतीय एक पाऊल वरच्या आहेत, ज्यात एसी आणि स्वयंचलित दरवाजेच्या लक्झरी आहेत.”

“हिंदी चीनी भाई भाई!”अशी कमेंट एकाने केली.

हेही वाचा –ओणम सणानिमित्त लहान मुलांनी काढलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने विस्कटली, धक्कादायक घटनेचा Video Viral

“ भारतीय आणि चिनी गाड्यां मधला फक्त स्वच्छता हाच फरक आहे असे ज्याला वाटते त्याला भारताच्या सामान्य ट्रेनच्या वर्गात प्रवास करण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसावा. YouTuber भारतीय सामान्य वर्गात इतक्या मुक्तपणे फिरू शकला नसता! याशिवाय, मला आशा आहे की YouTuber ने स्पष्ट केले की, या चीनच्या नॉन-हाय-स्पीड ट्रेन आहेत.”

“भाऊ पहा त्या गाड्या किती स्वच्छ आहेत. भारतात असे सामान्य प्रशिक्षक असतील तरच तुम्ही स्वप्न पाहू शकता.”

“लोकांची दिशाभूल करणे बंद करा. चीनमध्ये धावणाऱ्या जुन्या पिढीतील सर्वात कमी किमतीच्या गाड्यांपैकी ही फारच कमी किंमतीचे तिकीट असणारी ही ट्रेन होती. तरीही त्यांचे आतील भाग आमच्या सर्वाधिक किमतीच्या गाड्यांपेक्षा चांगले दिसतात.”

Story img Loader