similarities between Chinese and Indian general train coaches : देशभरामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. १.४५ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाचे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन ही भारतीय रेल्वे आहे. भारतीय रेल्वेच्या हजारो गाड्या कोटीहून अधिक प्रवाशांसह विविध मार्गावर धावतात. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये दिसणारी प्रवाशांची गर्दी सामान्य गोष्ट आहे. भारतीय रेल्वेच्या डब्यांमध्ये खचाखच गर्दी, बसायला जागा नाही, लोक जागा मिळेल तिथे झोपतात अगदी शौचालयाजवळही झोपतात अशी अवस्था दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतीय रेल्वेची जी अवस्था आहे तीच अवस्था चीनमधील ट्रेनची देखील आहे. एका भारतीय यूट्यूबरने अलीकडेच भारतीय ट्रेन आणि चीनमधील ट्रेनच्या सामान्य डब्यांची तुलना करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा