Viral Video: हवेत झेपावलेल्या एका विमानाचे चाक हवेतच निखळल्याची धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. Boeing 747 Dreamlifter या विमानाने इटलीतील Taranto-Grottaglie विमानतळावरून उड्डाण भरले होते, धावपट्टीवरून विमान जेव्हा हवेत झेपावले यानंतर काहीच सेकंदात विमानाचे एक चाक निखळले व धावपट्टीवरच खाली पडले. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हा एकूण थरार पाहायला मिळत आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये 747-400 ड्रीमलिफ्टरच्या अंडरकॅरेजमधून अचानक काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. बोईंग 747-400 लार्ज कार्गो फ्रायटर (LCF) ड्रीमलिफ्टर विमान हे Atlas एअर वर्ल्डवाईड होल्डिंग द्वारे हे चालवले जाते. हे एक वाइड-बॉडी मालवाहू विमान आहे. इटली, जपान आणि यूएस दरम्यान बोईंग 787 ड्रीमलाइनरचे भाग वाहतूक करण्यासाठी या विमानाची रचना करण्यात आली होती.
सुदैवाने हे मालवाहू विमान असल्याने यात कोणतेही प्रवासी नव्हते तसेच वैमानिक व अन्य क्रू मेंबर्सही सुरक्षित असल्याचे समजत आहे. दरम्यान हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही हे निश्चित….
अन हवेतच निखळले विमानाचे चाक
Video: बोअरवेल मधून येऊ लागली दारू! बातमी समजताच पोलिसांनी मारला छापा पण घडलं भलतंच..
बोईंग 747-400 विमानाचे चाक हवेतच निखळाल्याच्या ११ तासांनंतर दक्षिण कॅरोलिना येथील चार्ल्सटन बोईंग उत्पादन केंद्रात विमान सुरक्षितपणे उतरले अशी माहिती सध्या समोर येत आहेत. ही घटना घडल्यानंतर या प्रकाराची माहिती क्रू मेंबर्सना तातडीने देण्यात आली होती. दरम्यान विमान उड्डाणाच्या आधी त्याची तपासणी झाली नव्हती का? नेमका हा तांत्रिक बिघाड कशामुळे घडला असावा याबाबत चौकशी होणार आहे.