प्रेमाची भावना सर्वव्यापी आहे हे तर सगळ्यांनाच मान्य आहे पण हे प्रेम व्यक्त करण्याच्या तऱ्हा निराळ्या. कोणाला सगळ्यांच्या समोर अगजी खुल्लम् खुल्ला प्रेम करणं आवडतं. तर काही जोड्यांचं त्यांच्यात्यांच्यातच ‘आपलं तुपलं जमतं’. पण हो! हे प्रेम व्यक्त करण्याचा जो क्षण असतो तो या जोडप्याच्या जीवनात फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या नात्यात एक नवा अध्याय सुरु होणार असतो. त्याचीच साक्ष हा प्रसंग देतो.
‘मेरे लिये क्या कर सकते हो तुम’ असं जेव्हा हिंदी सिनेमातली हिरोईन तिच्या नाजूक नेत्रकटाक्ष टाकत विचारायची तेव्हा चाँद तारे वगैरे तोडून आणायची भाषा तिचा तो प्रियकर करायचा. आता हे कितीही टिपिकल वाटलं तरी तुझ्या मनात माझ्याविषयीच्या भावना किती तीव्र आहेत असंच यावेळी तिला विचारायचं असायचं.
या प्रश्नाचं उत्तर द्यायला जगभरातले मजनू वाट्टेल ते करायला तयार होतात. मग ते प्रपोजल करायला एखाद्या रम्य ठिकाणी जाण असो. किंवा मग अक्षरश: आकाशातून पडलेल्या उल्केच्या शेजारी उभं राहणं असो. आशिक दीवाने वाट्टेल ते करायला तयार होतात. यासाठी नव्या नव्या क्लुप्त्या लढवल्या जातात. आतासुध्दा नेटवर असाच एक फोटो प्रसिध्द झाला आहे.
या फोटोमध्ये एक मुलगा स्कायडायव्हिंग करताना दिसतो आहे. आणि स्कायडायव्हिंग करत असताना त्याने त्याच्या हातात एक बोर्ड धरला आहे. ‘माझ्यासोबत ‘प्राॅम’ला येशील का असा प्रश्न आपल्या मैत्रणीला हा मुलगा विचारतोय. आणि तेही स्कायडायव्हिंग करत! प्राॅम म्हणजे ग्रॅज्युएशनंतर आयोजित होणारा डान्सचा कार्यक्रम. म्हणजे लग्न, रिलेशनशिप असं काही नाही. फक्त प्राॅमला येशील का हे विचारण्यासाठी मायर्स नावाचा हा मुलगा स्कायडायव्हिंग करत, हातात बोर्ड धरत (त्याचा फोटोही काढत) स्कायडायव्हिंग करता करता विचारतो आहे.
शेवटी प्रेमातही पडायचंच असतं ना!
पण सध्यातरी वाईट जोक्स बाजूला ठेवत आपल्या मैत्रिणीसाठी स्कायडायव्हिंग करणाऱ्या या मुलाच्या शौर्याला दाद देऊया.पाहा पुढचा व्हिडिओ.