Smoking Viral Video: आजकाल बऱ्याच लोकांना धूम्रपानाचे व्यसन असते. जवळजवळ सर्व वयोगटातील लोक या व्यसनाला बळी पडत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये, त्याचा छंद खूप वाढला आहे. या व्यसनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि अनेक आजार होऊ शकतात. धूम्रपान करणाऱ्या लोकांना कॅन्सर , फुफ्फुसाचे आजार, स्ट्रोक आणि इतर अनेक समस्या होऊ शकतात. वेळोवेळी लोकांना निरोगी राहण्यासाठी आणि धूम्रपान न करण्याबद्दल जागरुक केले जाते मात्र तरीही ते बंद होत नाही. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घातली असली तरी सर्रास लोक नियम तोडतात. अशाच एका सिगरेट ओढणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून तुम्हीही कदाचीत सिगरेट पिणं सोडून द्याल. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.
क्षणात होत्याचं नव्हत झालं! –
सध्या सोशल मीडियावर वेळोवेळी असे व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती दुकानात उभा आहे. थोड्यावेळानंतर तो खिशातील सिगारेट काढतो आणि पेटवतो, त्याच क्षणी त्याच्या हातातील सिगारेट पेट घेते आणि सोबतच त्या व्यक्तिच्या संपूर्ण शरिराला आग लागते आणि दुकानालाही आग लागते. हा स्फोट इतका भिषण आहे, यामध्ये सर्व जळून खाक होतं. त्या व्यक्तीसोबत दुकानात असणारे आणखी दोघेही आगीत होरपळतात.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – काय तर म्हणे ‘आमरस’ चीज डोसा, Video पाहून सांगा हे विचित्र फूड तुम्ही खाऊ शकता का?
या व्हिडीओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक लाईक्स गेले आहेत. तर अनेक जणांना व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.