Viral video: कोणताही सण, उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. घर-दार विसरुन कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या पोलिसांचे अनेक किस्से आपण एकत असतो. अनेक वेळा पोलीस आपल्या कर्तव्यात इतके व्यस्त होतात की त्यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशावेळी जर पोलिसांची कुणी आपुलकीनं विचारपूस केली तर नक्कीच त्यांना आनंद होईल. पोलीस नेहमीच इतरांना मदत करत असतात. मात्र यावेळी एका तरुणानं केलेलं कृत्य पाहून माणुसकी अजूनही जिवंत आहे असं तुम्ही म्हणाल.
सध्या कडक उन्हाळा आहे, प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आतापासून काही दिवस घराबाहेर पडू नका अन्यथा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे सांगितले आहे. उष्मा एवढा आहे की, राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कर्तव्यावर असताना उष्माघातामुळे एका जवानाचा मृत्यू झाला. पण तरीही कर्तव्य बजावणारे आपले इतर सैनिक कर्तव्य बजावत आहेत. अशा परिस्थितीत या कडक उन्हात वाहतूक पोलीसही आपले कर्तव्य बजावत आहेत, उन्हाळ्यात वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना उष्माघात किंवा वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशातच एका मुलानं ट्राफिक पोलिसांना भर ऊन्हात उभं असताना पाण्याच्या बॉटल्स दिल्या. आपल्यासाठी भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना हे काम केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पोलिसांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद पाहू शकता
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर लोक त्याला खूप पसंत करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> नीता अंबानी यांचा ५०० कोटींचा नेकलेस मिळतोय फक्त १७८ रुपयांना; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर लोक त्याला खूप पसंत करत आहेत. ब्लेसिंग पॉवर नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ३.६ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला १ लाख ९३ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत युजर्सही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…आजपर्यंत आम्ही फक्त पोलिसांना लोकांशी वाद घालताना पाहिले आहे, आज पहिल्यांदाच सकारात्मक चित्र दिसले आहे. आणखी एका युजरने लिहिले… प्रत्येक गणवेशातील सैनिक हा सैनिक असतो.