घरात लहान मूल असणे म्हणजे घराच्या भिंतीवर वेगवेगळी चित्रे, रेषा, रंगरंगोट्या या आल्याच… जमिनी, भिंती आणि त्यांच्या हातात येणारा प्रत्येक कागद त्यांना मिळालेल्या पेन, पेन्सिल, रंगाने रंगवावासा वाटतो. आतापर्यंत लहान मुलांनी घराच्या भिंती, वही, पेपर रंगवलेले तुम्ही पाहिले असतील, ऐकले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात एका लहान मुलाने तर याही पलिकडे एक पाऊल पुढे टाकलंय. या व्हिडीओमधल्या लहान मुलाने घराच्या भिंती नव्हे, कागद किंवा वही नव्हे तर चक्क चकाचक चमकणाऱ्या कारवर आपली क्रिएटिव्हिटी दाखवलीय. या रेखा रंगरंगोटी करायला या मुलाने कोणतंही पेन किंवा खडू वापरले नाहीत. तर चक्क लिपस्टिकने त्याने या करामती केल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा चक्क लिपस्टिकने पांढऱ्या शुभ्र कारला रंगवताना दिसतोय. खाली वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिकचा ढीग पडलेला दिसतोय. या सर्व लिपस्टिक वापरून या चिमुकल्याने पांढरी शुभ्र कार अगदी रंगीबेरंगी करून टाकली आहे. पांढऱ्या कारवर या मुलाने आडव्या तिडव्या रेखा रेखाटून त्याची ही क्रिएटिव्हिटी साकारली आहे. मुलाची ही करामत पाहताना लोकांना हसू आवरत नाहीय. कारवर रेषा रेखाटताना हा मुलगा अतिशय गोंडस दिसतोय. हा व्हिडीओ पाहण्यासाठी मजेदार तर आहेच, पण कारला रंगवून नंतर जे मुलगा करतो ते फार रंजक आहे.
कारला आपल्याला हवं तसं रंगवून हा मुलगा पटकन आपल्या इवल्याश्या गाडीत बसतो आणि तिथून गपचूप पळ काढताना दिसतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता स्पष्टपणे दिसून येतेय. हा व्हिडीओ पाहून लोकांना या मुलाचा क्यूटनेस फारच आवडू लागलाय. ‘किती गोड’ असे उद्गार तोंडी आल्याशिवाय राहत नाही.
आणखी वाचा : शार्कसोबत पाण्यात रोमँटिक डान्स करताना दिसला हा माणूस, VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : एकच नंबर! संधिवात असलेल्या कुत्र्यासाठी चक्क अशी लिफ्ट बनवली! VIRAL VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ MorissaSchwartz नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर होताच वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ लाईक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.