Viral Video: मे महिन्यातले कडाक्याचे ऊन पाहता, कधी एकदाचा पाऊस पडतोय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होतेय. या कडक उन्हातून प्रवास करताना जीव अगदी नकोसा होतो. अशा वेळी घरी गेल्यावर थंडगार पाण्यानं अंघोळ केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात उन्हाला वैतागलेला एक तरुण भररस्त्यात अंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर तरुणांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. या व्हिडीओंमध्ये तरुण मंडळी कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही या तरुणानं असाच जुगाड केल्याचं दिसत आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

हा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील असून, इन्स्टाग्रामवरील @barshiwala या पेजवरून तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरउन्हात सिग्नलवर बऱ्याच गाड्या थांबल्या आहेत. त्यावेळी स्कुटीवर बसलेल्या दोन तरुणांपैकी मागे बसलेल्याने समोर ठेवलेल्या बादलीतील पाणी मगानं आधी स्वतःच्या अंगावर ओतलं आणि त्यानंतर त्यानं पुढे बसलेल्या तरुणाच्याही अंगावर ओतलं.

हेही वाचा: मला चिंब चिंब होऊ दे; पावसात भिजण्यासाठी श्वानाचा मालकिणीला चकवा; VIDEO पाहून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि पाच हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये ‘उन्हाने वैतागलेले तरुण सोलापूर जिल्ह्यामध्ये’, असं लिहिण्यात आलं आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरनं लिहिलंय, “हा इतक्यात उन्हाला वैतागला. अजून मे महिना बाकी आहे.” तर, दुसऱ्यानं लिहिलंय, “खरंच सध्या खूप ऊन आहे.” तर, आणखी एकानं लिहिलंय, “असे व्हिडीओ काढण्यासाठी लोक काय काय करतात?”

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी उन्हानं वैतागलेल्या एका श्वानाचादेखील व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात त्यानं चक्क आपल्या मालकिणीला चकवा देऊन पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

Story img Loader