Viral Video: प्रत्येक लेकरासाठी त्याच्या बालपणी त्याचे आई-वडील जितके महत्त्वाचे असतात, तितकेच त्याच आई-वडिलांसाठी त्यांच्या म्हातारपणी मुलं महत्त्वाची असतात. आई नऊ महिने कळा सोसून आपल्या मुलांना जन्म देते, हे सुंदर जग दाखवते; तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात, लहानपणापासून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपण जे दु:ख भोगलं, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण देतात. मुलं मार्गी लागली की, त्यांचे लग्न लावून देतात. परंतु, एकदा मुलांचे लग्न झाले की त्यांना हळूहळू आई-वडील नकोसे वाटू लागतात. आपल्या सुखी संसारात आई-वडिलांच्या गरजा, आजारपणं भागवणं त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही.

अनेक परदेशात गेलेली मुलं तर वृद्ध आई-वडिलांना इकडे सांभाळणार कोण? म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात; तर काही जण आई-वडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता त्यांच्याच घरात राहून त्यांना नरक यातना देतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कुटुंबामध्ये सासू आणि सुनेमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरू होतो आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो. त्यांची हाणामारी सुरू होताच मुलगा आणि त्याचे वडील तिथे येतात. यावेळी तो मुलगा त्याच्याच आईला पायाने जोरात लाथ मारतो आणि नंतर वडिलांनाही मारहाण करायला सुरुवात करतो. मुलगा आणि त्याची बायको, आई-वडिलांना मारहाण करू लागतात. यावेळी एक महिला आणि पुरुष तिथे येतात आणि त्या मुलाच्या आई-वडिलांना घराबाहेर घेऊन जातात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये, “हे खरं आहे साहेब, लग्नानंतर मुलं बदलतात… बायकोच्या सांगण्यावरून त्याने स्वतःच्या आई-वडिलांना मारहाण केली”, असं लिहिण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sonia_kumari78926 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स आल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “तो मुलगा नालायक आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मुलगा म्हणायच्या लायकीचा नाही हा”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “तो कधीच सुखी होणार नाही.”

Story img Loader