मनात एखागी गोष्ट ठरवली तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज शक्य होते. याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंगळुरू येथील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या अंगावरच रिक्षा पलटी झाली. तिथे उभ्या असलेल्या महिलेच्या लेकीने तिला वाचवण्यासाठी जे काही केले ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अपघाताचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील पण, फार क्वचित प्रसंगी लोक इतरांच्या मदतीला धावून येतात. आपल्या आईला वाचवण्यासाठी शाळकरी मुलीने जे धाडस दाखवलं आहे ते पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहे.

मंगळुरूमधील किन्नीगोली येथे ही घटना घडली. जिथे एका शाळकरी मुलीने आईचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षा उचलली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलीला शिकवणी वर्गातून घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एक रिक्षा येऊन तिला जोरात धडक देत असल्याचे दिसून येते. अचानक ब्रेक मारल्याने वेगवान रिक्षा तिथेच पलटी होते अन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या अंगावर पडते. दरम्यान हा सर्व प्रसंग पाहून आपल्या आईला वाचवण्यासाठी एक शाळकरी मुलगी घटनास्थळी धाव घेते आणि झटक्यात रिक्षा उचलून आपल्या आईचा आणि रिक्षातील लोकांचा जीव वाचवते. संपूर्ण ताकद वापरून ती क्षणात रिक्षा बाजूला करते आणि आईला बाजूला घेऊन रडू लागते. व्हिडिओमध्ये त्याच्या ओरडण्याचे आवाजही ऐकू येत आहेत. यानंतर महिला व मुलीच्या मदतीसाठी रस्त्यावरून जाणारे नागरिक तातडीने जमा झाले.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

हेही वाचा – नदीकिनारी सेल्फी काढत होते पर्यटक, अचानक मोठी लाट आली अन् क्षणार्धात वाहून गेले सारे…, पाहा धडकी भरवणारा VIDEO

हा सर्व प्रकार तेथील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की, “एवढ्या लहान मुलीने रिक्षा कशी काय उचलली?.” नेटकऱ्यांनी मुलीच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे तिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. एका यूजरने लिहिले की, “त्या मुलीला काही पुरस्कार द्यायला हवा. व्हिडिओ बनवण्याऐवजी तिने लगेच मदतीसाठी उडी घेतली. त्यांच्यासारख्या तरुणांची गरज आहे.

हेही वाचा – “कोकणची संस्कृती!”, दादरच्या रेल्वे स्थानकावर कलाकारांनी सादर केली ‘शक्ती तूरा’ लोककला, पाहा Viral Video

आणखी एका महिला युजरने लिहिले, “वाघीण आहे, राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित होण्यास पात्र आहे.” एकाने असेही लिहिले की, “ती मुलगी धाडसी म्हणून पदकास पात्र आहे.” तसेच अनेकांनी मुलीच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

Story img Loader