सोशल मीडिया अनेक नवनवे व्हिडीओ व्हायरल होत राहतात. इथे तुम्हाला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे हैराण करतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी तुम्हाला हे व्हिडीओ पाहून संतापही येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. कारण या व्हिडीओमध्ये दोन तरुण चक्क एस्केलेटरवर हाणामारी करताना दिसत आहेत. भांडता भांडता दोघेही एस्केलेटरवरून खाली कोलमडून पडतात. पण दोघांची फाईट मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल स्टेशनमधला आहे. दोन पुरूष एस्केलेटरवरून जात असतानाच एकमेकांसोबत भांडू लागले. त्यांचं हे भांडण थेट हाणामारीत रूपांतर झालं. एकमेकांसोबत हाणामारी करता करता ते एस्केलेटरवरून खाली कोलमडत पडत असल्याचं दिसून येत आहे. आता तुम्ही म्हणाल, दोघेही खाली पडल्यानंतर तरी यांचं भांडण मिटलं असेल. पण थोडं थांबा. कारण एस्केलेटरवरून खाली पडल्यानंतरही हे दोघे जण एकमेकांसोबत मारामारी सुरूच ठेवताना दिसून आले. यातील एका प्रवाशाने ही लढत कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडिया याचा व्हिडीओ शेअर केला.
आणखी वाचा : Same to same! जुळ्या बहिणींचा नवराही एक आणि आता प्रेग्नेंसीबाबत काय म्हणतात? वाचा…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : चिल्ड्रन पार्कमध्ये हत्ती घुसला, मग पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ रेडीट या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर r/nyc नावाच्या अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल होऊ लागला. रेडीटवर या व्हिडीओला ९७ टक्के अपवोट्स मिळाले आहेत. तर ४६४ यूजर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.