संकट कधी व कोणत्या प्रकारे ओढावेल हे कोणालाही सांगता येत नाही. काही घटना इतक्या चमत्कारीक असतात की त्यांच्याबद्दल ऐकलं ती नवल वाटतं. अशीच एक घटना समोर आली आहे. संकटकाळात तुमच्या मदतीसाठी जो धावून येतो तोच खरा देव. असं अनेकदा म्हटलं जातं. हा देव कुठल्याही रुपात मदतीला येऊ शकतो. खेळता खेळता एक लहान मुलगा भल्यामोठ्या फ्रिजखाली चिरडला जाणार होता. पण इतक्यात बाजुला असलेला वेटर अगदी देवाप्रमाणे धावून आला आणि त्याच्या हातात असलेल्या एका ट्रेच्या मदतीने या चिमुकल्याला जीव वाचवला. एका ट्रेच्या मदतीने कसा काय जीव वाचवला जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO पाहाच.

जेव्हा मुलांचे पालक रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी जात असतात, तेव्हा त्यांची मुलं इथे तिथे खेळत बागडत असतात. मुलं खेळत आहेत, असं समजून कधी पालक आपल्या धुंदीत राहतात, हे कधी कधी मुलांच्या जीवावर ही बेतू शकतं. मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला मोठ मोठे फ्रीज, मोठे कंटेनर आणि कॉफी मशीन यासारखे जड मशीन ठेवण्यात येत असतात. हीच मुलं खेळता खेळता या मोठ मोठ्या मशीन्ससोबत खेळता खेळता आपला जीव धोक्यात घालू शकतात, हा विचार पालकांनी करायला हवा. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक लहान मुलगी रेस्टॉरंटमध्ये खेळता खेळता बाजुला ठेवलेल्या मोठ्या आकाराच्या फ्रिजसोबत खेळू लागतो. या मोठ्या आकाराच्या फ्रिजची दोन्ही दरवाजे तो झटके देत उघडू लागतो. यात तो मोठा फ्रिज कोलमडून त्या लहान मुलाच्या अंगावर कोसळतो. हा लहान मुलगा भल्या मोठ्या आकाराच्या फ्रिजखाली येऊन चिरडून जातो की काय, अशी भीती मनात येते. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी! अशा या म्हणीप्रमाणेच भल्यामोठ्या फ्रिजखाली येऊन सुद्धा या लहान मुलाचा जीव वाचतो.

झालं असं की, हा लहान मुलगा फ्रिजसोबत खेळता खेळता फ्रिजच या मुलाच्या अंगावर कोसळत असताना बाजुने येत असलेला वेटर अगदी देवाप्रमाणे त्याच्या मदतीला धावून आला. या वेटरने त्याच्या हातात असलेल्या एका सर्व्हिंग ट्रेच्या मदतीने या फ्रिजला खाली पडता पडता रोखलं. हातात ट्रे जसा आहे तसा फ्रिजच्या खाली टेकवत या वेटरने मुलाच्या अंगावर फ्रिज य़ेण्यापासून थांबवलं. फ्रिज अगदी खाली आल्यानंतर या वेटरने आपल्या हातातलं ट्रे बाजुला टाकलं आणि हाताने फ्रिजला वर केलं. त्यानंतर लहान मुलगा कसंबसं या फ्रिजखालून बाहेर पडतो आणि बाजुला होतो.

हे दृश्य खरोखरंच मनात धडकी भरवणारं आहे. वेटरच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचा जीव वाचला. हा व्हिडीओ रेडिटवर @blake_HEADACHE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. क्लिपने आता Reddit वर १६ हजारांपेक्षा जास्त अपव्होट्स मिळवले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवरही या इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अबब ! एका बिअर कॅनमध्ये अडकला चार फूटाचा कोब्रा…

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

Waiter uses food tray to save mischievous little kid from being crushed by a refrigerator unit in restaurant from nextfuckinglevel

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रसंगावधान दाखवून मुलाचा जीव वाचवणाऱ्या वेटरचं बरंच कौतुक करण्यात येतंय. त्याचप्रमाणे अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. या घटनेत वेटर ट्रेच्या ऐवजी हाताचा वापर करू शकला असता असं देखील काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काही नेटकऱ्यांनी यावर युक्तीवाद करत वेटरला हातातला ट्रे बाजुला ठेवण्यात खूप वेळ गेला असता , असं देखील म्हटलंय. तर काहींनी कमेंट करत म्हटलं की, ट्रे फेकून द्यायला खूप कमी वेळ लागला असता आणि मोकळ्या हाताने फ्रिज खाली कोसळण्यापासून वाचवताना अडचणी आल्या नसल्या.

आणखी वाचा : लग्नाआधी मित्राने नवरीला विचारलं, “तुला कसं वाटतंय?” मिळालं हे उत्तर, पाहा VIRAL VIDEO

मात्र, या व्हायरल व्हिडीओमुळे सर्व पालकांचे डोळे मात्र उघडले आहेत. कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर लहान मुलांवर केलेलं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं याचं उदाहरण या व्हिडीओने दिलंय.

Story img Loader