उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशी म्हण आपल्याकडे आहे. अशाच लग्नासाठी उतावळ्या झालेल्या एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा नवरदेव लग्नासाठी इतका उतावळा झाला की त्याने मोठी रिस्क घेतली.पावसात बाहेर पडायला लोक खूप वैतागतात. थोडं पाणी साचलं तरी लोक घराबाहेर पडत नाही. अशातच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नासाठी वाट्टेल ते!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. या पावसात आपण घराबाहेरही पडणार नाही, मात्र या व्हिडीओमध्ये दिसत असलेले नवरा नवरी एवढ्या पावसात चक्क लग्नाचे सात फेरे घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. लग्नाच्या विधीदरम्यान जोरदार पाऊस सुरू होतो. अशा परिस्थितीत पाऊस थांबण्याची वाट पाहण्याऐवजी वधू-वर छत्र्या घेऊन लग्न करत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: रस्त्याच्या कडेलाच पट्टेदार वाघाने मांडले ठाण! लोकांनी घाबरून जागेवर थांबवल्या गाड्या
काही दिवसांपूर्वी एका लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये लग्नात चक्क नवरी लॅपटॉप घेऊन काम करताना दिसली. खरंतर लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे सर्वच जण तो दिवस आनंदाने साजरा करतात. मात्र व्हिडीओत नवरी कामात मग्न असलेली पाहायला मिळाली होती. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून तो अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाला. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या होत्या.