Wedding Viral Video: लग्नसराईचे दिवस म्हटलं की हल्ली सोशल मीडियावरही लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; परंतु यामध्ये वधू-वर चक्क भांडताना दिसत आहेत.

पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणं फार मोठी गोष्ट नाही. असं म्हणतात, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस वधू-वरांसाठी खूप खास असतात. या दिवसांमध्ये दोघेही एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने बोलतात. पण, लग्न जसं जुनं होतं तसे दोघांमध्ये वाद सुरू होतात. प्रत्येक जोडप्यामध्ये या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न लागल्या लागल्या वधू-वरामध्ये वाद झालेला पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नमंडपामध्ये लग्न पार पडल्यानंतर वधू-वर जेवण करण्यासाठी बसतात. यावेळी वधूचे लक्ष तिच्या फोनमध्ये होते, ज्यामुळे वर तिच्या हातातला फोन काढून घेतो आणि बाजूला ठेवतो. यावर वधूला त्याचा खूप राग येतो. ती त्याला रागात काहीतरी बोलते, ज्यावर वर पुन्हा तिचा फोन तिला देतो व भरल्या ताटावरून उठून निघून जातो. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @love_song_officil या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला पाच लाख व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “त्याचं बरोबर आहे, पण हेच जर तिने त्याच्याबरोबर केलं असतं तर”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “दोघे आपापल्या जागी बरोबर आहेत.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भावाला खूप हर्ट झालं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बायको बालिश आहे.”