Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावरही लग्नातील अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीरही असतात. या मजेशीर व्हिडीओंमध्ये कधी कधी नवदेवाच्या मित्रांनी दिलेलं अनोखं गिफ्टही पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडीओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करतानाही दिसत आहेत. कारण, यामागचे कारणही तसेच आहे.

खरं तर, नुकतेच काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये घडलेले सौरभ हत्याकांडाचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात सौरभच्या पत्नीने प्रियकराला हाताशी घेऊन सौरभची हत्या करून, त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवला होता. या प्रकरणानंतर सोशल मीडियावरील अनेक युजर्स फक्त काही व्ह्युज मिळवण्यासाठी ड्रमवर आधारित अनेक कॉमेडी व्हिडीओ, जोक्स शेअर करीत होते. त्यातच आता या एका व्हिडीओची भर त्यात पडली आहे, जे पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी स्टेजवर उभे असून यावेळी नवरदेवाचे मित्र तिथे हातामध्ये निळ्या रंगाचा ड्रम घेऊन येतात आणि दोघांसमोर ठेवतात. हे पाहून सुरुवातीला नवरी घाबरते. त्यानंतर नवरा-नवरी हसायला सुरुवात करतात. ही गोष्ट पाहायला गमतीशीर वाटत असली तरीही तितकीच गंभीरही आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @smile_please_1956 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यावर व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं लिहिलंय, “लोकांनी या गोष्टीलापण मजाक बनवून टाकलं आहे”. या व्हिडीओवर एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करीत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “आजकाल दुसऱ्याचं दुःख हा करमणुकीचा भाग झालाय”. आणखी एकानं लिहिलंय, “Trend च्या नादात लोक विचारपण करायचे बंद झाले की आपण करतोय काय… लोक पागल झाले”.