Bride Viral Video : लग्न म्हटलं की धमाल आलीच. कसलाही संकोच न करता आजकाल नवरी आणि नवरदेव सोबतच मस्ती करताना आपल्याला दिसतात. नव्या जोडीच्या मस्तीचे मजेदार व्हिडीओ आपण यापूर्वीदेखील पाहिले असतील. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अगदीच वेगळा आणि मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नव्हे तर नवरी ‘खुले के’ जगत आहे. काही क्षणांत बोहल्यावर चढणार असली तरी कसलीही चिंता न करता नवरी आनंदात चायनीज स्नॅक्स खात आहे.

चिली चिकन चॉवोमीन, फ्राईड राईस, मंच्युरीयन, लॉलीपॉप हे नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं…मग यात भारतीयांचा पहिला नंबर लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ याचा पुरावा देतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तपकिरी रंगाच्या आकर्षक लहंग्यामध्ये नवरी अगदी साज श्रृंगार करून बसलेली आहे. तिच्यासमोर देसी चायनीज स्नॅक्समधील वेगवेगळे पदार्थ मांडलेले दिसून येत आहे. नवरीचा साज चढवल्यामुळे आता लगेच तिला बोहल्यावर चढावं लागणार आहे. पण मध्येच तिला देसी चायनीज स्नॅक्स दिसले आहे. मग काय, कशाचीही चिंता न करता या नवरीने देसी चायनीज स्नॅक्सवर ताव मारला आहे. लग्न होत राहील पण अगोदर देसी चायनीज स्नॅक्सची चव चाखली पाहिजे असे म्हणत ही नवरी खाताना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Live Larvae Found in Maggie shocking maggie video goes viral on social media
मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking Stunt Video
VIDEO : लायटरबरोबर नको ती स्टंटबाजी! क्षणार्धात चेहऱ्याने घेतला पेट अन्…पुढे काय घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का
The lion grabbed the kid's t-shirt listen what he said funny video goes viral
“सोड रे माझं शर्ट फाटेल” सिंहाची भीती नाही आईची भीती; सिंहाच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!

आणखी वाचा : टांझानियन तरुणाचा आता ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

देसी चायनीज स्नॅक्समधील एक पदार्थ खाऊन झाल्यानंतर तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. नवरीबाईचा देसी चायनीज स्नॅक्स खातानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही हा व्हिडिओ पाहून खळखळून हसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत १.७ मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय अजगर रस्ता ओलांडत होता, सर्व वाहने थांबली पण हा काही थांबला नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुलाने मोबाइल गिफ्ट केल्यानंतर आईचा आनंद अनावर; व्हिडीओ पाहून तुमचंही मन भरुन येईल

हा व्हिडीओ the_streetfood_center नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. नवरीबाईला खाण्याची किती आवड आहे आणि खाण्याशिवाय तिला सध्या दुसरं काहीच दिसत नाही, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. या व्हायरल व्हिडीओमधल्या नवरीबाईचं नाव साक्षी जोशी असून ती स्वतः एक डॉक्टर आहे. सोबत ती फूड ब्लॉगर सुद्धा आहे. ‘the_streetfood_center’ नावाने इन्स्टाग्रामवर तिच्या फूड ब्लॉगचं पेज आहे. यावर ती वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. “मी एक खादाड सून आहे आणि हे माझ्या सासरच्यांना सुद्धा आवडतं” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.

आणखी वाचा : बर्फावर धावणाऱ्या पेंग्विनचा हा VIRAL VIDEO पाहून कुटुंब का महत्त्वाचं आहे हे समजेल

या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी आपल्या कुटुंबातीला सदस्यांना, मित्रांना किंवा इतर जवळच्या लोकांना टॅग केलं आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत आपणही देसी चायनीज लव्हर असल्याचं सांगितलं.

Story img Loader