लग्नात नवरी नवरदेव सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात. त्यांना बघण्यासाठी पाहूणेही गर्दी करतात. यादरम्यान नवरी नवरदेव आपल्या अनोख्या अंदाजाने लोकांचं मन जिंकून घेतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरी खिडकीत उभी राहून नवरदेवाची वाट पाहत असते. जशी वरात येते तसं ही नवरी नवरदेवाला शोधत असते. नवरदेवाकडे पाहून ही नवरी त्याच्यासोबत खिडकीत उभी राहून नाचू लागते. नवरा नवरीच्या आयुष्यातला हा खास क्षण खरंच पाहण्यासारखा आहे. लग्नाच्या आधीचा हा क्षण पाहून प्रत्येकाचं मन पिघळून जात आहे. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, प्रत्येक मुलगी आपल्या लग्नासाठी काही खास स्वप्न पाहत असते. एक मुलगा आपल्या दारी घोड्यावर बसून आपल्याला लग्न करून त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार असे अनेक स्वप्न प्रत्येक मुलगी पाहत असते. जेव्हा हे स्वप्न प्रत्यक्षात खरं होतं, त्यावेळचा क्षण अनुभवणे काही बाबच निराळी असते. असंच स्वप्न पाहिलेल्या या नवरीबाईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक नवरी साज श्रृंगार करून सुंदर लाल लेहेंगा परिधान करून खिडकीपाशी उभी असते. बाहेर रस्त्यावरून नवरदेवाची वरात येताना ती पाहत असते. घोड्यावर बसून हा नवरदेव वरातीत दिसखुलासपणे नाचत असताना नवरीसुद्धा त्याच्यासोबत खिडकीतूनच नाचू लागते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! Ranbir Kapoor च्या Channa Mereya गाण्यावर जबरदस्त लिपसिंक

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चाकाखाली अडकलेली नोट काढण्यासाठी पठ्ठ्यानं काय शक्कल लढवली पाहा…; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचे ‘चल प्यार करेगी’ हे हिट गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजताना ऐकू येते. नवरेदव सुद्धा आपल्या भावी पत्नीला अगदी प्रेमान पाहत डान्स करताना दिसून येतोय. नवरदेव शेरवानीमध्ये खूपच हॅंडसम दिसून येत आहे. एका दिवसापूर्वी Instagram वर ‘witty_wedding’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय. या व्हिडीओमध्ये नवरदेव सुद्धा नवरीकडे पाहून नाचताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर नवरीचा बहिणीसोबत धांसू डान्स; पाहा हा शानदार व्हिडीओ

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की, आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ८८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लग्नाआधीचा हा क्षण लोकांना खूपच भावला असून लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या व्हिडीओमधल्या उत्सुक नवरीचं कौतुक केलंय तर काहींनी नवरदेवाचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video bride groom video dance window baraat wedding shadi dulha dulhan prp