Viral Video Today: लग्नातील सर्वात भावुक व हळवा क्षण म्हणजे लेकीची पाठवणी. आपलं घर, कुटुंब, बालपण सगळं मागे सारून मुलगी एका नव्या घराला आपलंसं करण्यासाठी निघते. कितीही मॉडर्न नवरी असली तरी हा एक क्षण प्रत्येकीसाठी महत्त्वाचा असतो. पण हा सर्व इमोशनल ड्रामा राहिला एका बाजूला आणि सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भलताच धिंगाणा पाहायला मिळत आहे. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी या वधूने मी जाणार नाहीच असा हट्ट धरला पण त्यावर तिच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे तिला सासरी धाडलं ते पाहून नेटकरी थक्कच झाले आहेत. अनेकांनी तर हे लग्न नाही अपहरण करण्याची पद्धत आहे असेही म्हंटले आहे. नेमकं असं काय घडलं पाहा…

व्हायरल व्हिडिओमधील ही नवरी आपल्या पाठवणीच्या वेळी जरा जास्तच भावुक झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते आणि काही केल्या ती आपल्या पतीच्या घरी जाण्यासाठी तयारच होत नव्हती. सासरी न जाण्याचा हट्ट घेऊन ही तरुणी भरमंडपातच मांडी घालून बसली, सुरुवातीला कदाचित तिला माहेरच्या माणसांनी समजावले असेल पण नंतर या नवरीचा हट्ट बघून माहेरची मंडळीही वैतागली आणि त्यांनी एकीकडून तिचा पाय एकीकडून हात असे पकडून उचलून तिला नवऱ्याच्या गाडीपर्यंत नेले.

नवरीची कधीही न पाहिलेली पाठवणी

अन त्याने गिअर बदलताना…१७ वर्षाची ‘ती’ गाडी शिकायला गेली अन ड्रायव्हरला.. Viral लव्ह स्टोरी पाहाच

इंस्टाग्रामवर @bridal_lehenga_designn अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ४४ हजार व्ह्यूज व हजारो लाईक्स आहेत. कदाचित तिच्या मनाविरुद्ध लग्न झाले असावे असेही कयास नेटकरी बांधत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हसायला पण येत आहे पण तितकाच त्या मुलींसाठी वाईटही वाटत आहे असे म्हंटले आहे. अनेकांनी तर हे लग्न नव्हे अपहरण आहे अशाही कमेंट केल्या आहेत.

Story img Loader