पूर्वी लग्नात पारंपरिक पद्धतीने सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात नवरी अगदी लाजेने गुलाबी होत, मान खाली घालत हळूवार पद्धतीने चालत यायची. पण आता चित्र बदललंय. या परंपरेला फाटा देत हल्ली लग्नात नवरी अगदी नवरदेवासारखीच बिनधास्त डान्स करत एंट्री करताना दिसते. तसा ट्रेंडच सुरू आहे. हल्ली प्रत्येकजण या ट्रेंडला फॉलो करत आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका बिनधास्त नवरीबाईच्या धमाकेदार एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरीबाईने चक्क ‘मेरे सैंया सुपरस्टार’ म्हणत या गाण्यावर डान्स करत नवरदेवाचं स्वागत केलंय. तिच्या अदाकारीने नवरदेवाबरोबर उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचा ठोका चुकला.

लग्नात नवरदेव वरात घेऊन लग्नमंडपाच्या दारी आला की नवरीकडची मंडळी त्याचं औक्षण करून स्वागत करताना तुम्ही आतापर्यंत पाहिलंय. पण या व्हिडीओमध्ये स्वतः नवरीबाईच आपल्या नवरदेवाचं स्वागत करताना दिसतेय. ते ही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर करून….या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सुंदर लाल लेहेंगा परिधान केलेली नवरीबाई तिच्या नवरदेवासमोर ‘एक पहेली लीला’ चित्रपटातील ‘मेरे सैंया सुपरस्टार’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. नवरी डान्स करत असताना उपस्थित सारेच जण टाळ्या वाजवत तिला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत. या नवरीने आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने लग्नाचा मांडव गाजवला.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स

आणखी वाचा : Aishwarya Rai ची डुप्लिकेट तुम्ही पाहिलीय का? या VIRAL VIDEO ला २४ मिलियन व्ह्यूज

नेटकरी तिच्या याच स्वॅगच्या आणि आत्मविश्वासावर फिदा झाले आहेत. लग्नाचा आनंद नवरीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतो. वजनदार लहेंग्यावर डान्स स्टेप्स करणं आणि एक्सप्रेशन देणं इतकं सोप काम नाही. या व्हायरल व्हिडीओमधल्या नवरीचं नाव आरती महाजन असं आहे.

आणखी वाचा : आपच्या महिला आमदाराला सर्वांसमोर कानशिलात लगावली, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Titanic: ११० वर्षांनंतर समोर आलेले टायटॅनिकचे हे फोटोज कोणी पाहिले नसतील

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘photoshoot_wedding’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ३८ हजारांपेक्षा जास्त लाईक्ससह व्हायरल झाला आहे. नेटिझन्स नवरीच्या डान्स परफॉर्मन्सने आणि स्वतः नवरदेवाचे स्वागत करण्याच्या तिच्या अनोख्या पद्धतीने प्रभावित झाले आहेत. लोक भरभरून या व्हिडीओवर प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

Story img Loader