Viral Video: बहीण-भावामधील प्रेम आणि भांडणं ही जगजाहीर असतात. ही भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. सतत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून बहिणीबरोबर वाद घालणारा भाऊ बहिणीच्या लग्नात सर्वांत जास्त रडताना दिसतो. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर तिच्याबरोबरचं गोड भांडण कायमचं संपणार आणि ती आपल्याला दररोज दिसणार नाही, या विचारानं भावाला गहिवरून येतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका हळदीमध्ये भावा-बहिणीचं अतूट प्रेम पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी नवरीला हळद लावण्यात आली असून, माहेरपासून दूर जाणार हे लक्षात आल्यामुळे ती ढसाढसा रडताना दिसत आहे. यावेळी तिला पाहून आसपास जमलेल्या इतर महिला आणि मुलीही रडू लागतात. यावेळी सर्वांत मागे उभा राहिलेला तिचा भाऊ तिला पाहून पुढे येतो आणि तिच्या गळ्यात पडून तोही रडायला सुरुवात करतो. या दोघांना असं रडताना पाहून आसपासच्या महिलाही रडू लागतात. हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tandel_puja_06 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला १८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करत आहेत. एक नेटकऱ्यानं लिहिलंय, “आता कांड कमी कर भावा वाचवायला कोणी नाही.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप भावनिक क्षण.” आणखी एकानं लिहिलंय, “हे दृश्य पाहून मलाही रडू आलं.”
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “दादा, डोळ्यांत पाणी आलं रे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “भाऊ-बहिणी कितीही भांडले; पण त्यांचं प्रेम कधीच कमी होणार नाय.” आणखी एकानं लिहिलंय, “ते कितीही भांडले तरी ते भाऊ-बहिणीच प्रेम आहे.”