Weeding Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका लग्न समारंभामध्ये मंगलाष्टके सुरू होताच भावाच्या डोळ्यांत पाणी येतं.

भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. त्यांच्यातील प्रेम आणि भांडणं जगजाहीर असतात. नेहमीच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून बहिणीबरोबर वाद घालणारा भाऊ बहिणीच्या लग्नात सर्वांत जास्त रडताना दिसतो. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर तिच्याबरोबरचं गोड भांडण कायमचं संपणार आणि ती आपल्याला दररोज दिसणार नाही, या विचारानं भावाला गहिवरून येतं. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात बहिणीच्या हळदीमध्ये भावाला त्याचे अश्रू अनावर झाले होते. आताही अशाच एका भाऊरायाचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो बहिणीच्या लग्नामध्ये रडताना दिसतो.

playschool children recreating Aye Meri Zohrajabeen from Phir Hera Pheri Movie
VIDEO: धोती घालून बाबुराव पळू लागला गोल गोल; नर्सरीच्या चिमुकल्यांची परफॉर्मन्समधील एकेक गोष्ट पाहून हसून व्हाल लोटपोट
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video Couple Dies, 2 Children Injured As Car Collides With Truck On Ahmedabad-Vadodara Expressway
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू,भयंकर अपघातानंतरही २ मुलं कशी बचावली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
China man revived after heart attack
रेल्वे स्थानकावर आला हृदयविकाराचा झटका; शुद्धीवर येताच म्हणाला, “मला कामाला जाऊ द्या”
Germen Bakery News
German Bakery : पुण्यातील जर्मन बेकरीच्या मालकिणीने सांगितली नकोशी आठवण, “१५ वर्षांपूर्वीचा तो दिवस…”
Mumbai Jogeshwari Oshiwara Furniture Market Fire
Oshiwara Furniture Market Fire : मुंबईत जोगेश्वरी येथे फर्निचर मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना
revenge resignation workplace trend
‘Revenge Resignation’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतेय याचे प्रमाण?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपात मंगलाष्टका सुरू असून, वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालण्यासाठी उभे आहेत. यावेळी मंडपामध्ये उपस्थित असलेला वधूचा भाऊ मंगलाष्टके सुरू होताच रडायला सुरुवात करतो. यावेळी तो डोळे पुसून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला रडणे थांबवता येत नाही. मंगलाष्टकांच्या शेवटी तो हुंदके देत देत रडू लागतो. भावाच्या मनातील बहिणीबद्दलचं हे प्रेम पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @singer_prathamesh_allrounder या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करत आहेत. एक नेटकऱ्यानं लिहिलंय, “खूप सुंदर” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप भावनिक क्षण.” आणखी एकानं लिहिलंय, “भावाचा प्रेम.”

Story img Loader