सीमा सुरक्षा दलाच्या पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी पंजाबमधील अटारी सीमेवर एका पंजाबी गाण्यावर ठेका धरला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा या व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. होळीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सेलिब्रेशन दरम्यान हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिफेन्स न्यूज इंडियाच्या फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून हा व्हिडिओ पाहिल असून ६२ हजारांपेक्षा अधिक लोक या व्हिडिओवर रिअॅक्ट झाले आहेत. जवानांनी पंजाबी गाण्यावर ताल धरलेल्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. आतापर्यंत २३ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सीमेवरील बिटिंग रिट्रिटच्या कार्यक्रमानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाबी गाण्यावर मनसोक्त नृत्य केले. यावेळी महिला सैनिकांनीदेखील त्यांना साथ दिली. नेहमी कर्तव्यावर असताना देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांनी नृत्याचा आनंद लुटला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जवानांचा उत्साह वाढवला.