Viral Video: आईएवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करत नाही. मग ती आई एखादी मानव असो किंवा प्राणी. आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. आईच्या तिच्या मुलांवरच्या निर्व्याज प्रेमाची एक नाही, तर लाखो उदाहरणे आहेत. त्यातून मुलांबद्दलचे मातेचे नि:स्वार्थी प्रेम दिसून येते. सध्या जंगालातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक म्हैस आपल्या जीवाची पर्वा न करता, पिल्लाला वाचविण्यासाठी असे काही करते, जे पाहून नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.
जगातील कुठलाही सजीव असो; प्रत्येक जण आपली भूक भागविण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटविण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात. त्याचप्रमाणे हिंस्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, प्राण्यांच्या शिकारींचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन सिंह म्हशीच्या रेडकावर हल्ला करताना दिसत आहेत. परंतु, यावेळी अचानक त्याची आई तिथे येते आणि त्या सिंहांच्या तावडीतून रेडकाला वाचवते. म्हशीच्या हल्ल्यामुळे दोन्ही सिंहदेखील घाबरून पळून जातात.
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये, “म्हैस आपल्या कुटुंबातीला पिल्लाला वाचवते” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्स आल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “आईचे प्रेम खूप अनमोल आहे. त्याची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “असे व्हिडीओ मनाला भावतात.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप छान.” चौथ्या युजरने लिहिलेय, “शेवटी आईच आहे तीपण.”