‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ तुकाराम महाराजांचा हा अभंग तुम्ही ऐकला असेल. या ओळींमधल्या भावना आता प्राण्यांनीही प्रत्यक्षात उतरवले आहेत. म्हैस आणि कासवाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला याच अभंगाची आठवण येईल. प्राण्यांना त्यांचे भाव बोलून व्यक्त करता येत नसले तरी त्यांच्यामध्येही भावना असतात. याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. म्हैस आपल्या अनोख्या स्टाईलने कासवाला मदत करताना या व्हिडीओमध्ये दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक म्हैस झाडाजवळ मोकळ्या जागेत बांधलेली आहे. तिच्या अगदी जवळ एक लहान कासव आहे जे उलटे होऊन पडले आहे. हे कासव आपल्या पाठीवर पडलेलं आहे. पाठीवर पडून ते जमिनीवर फडफडताना दिसत आहे, तर शेजारी झाडाला बांधलेली एक म्हैस त्याला आपल्या शिंगानी मदत करण्याचा प्रयत्न करतेय. कासवाला मदत करण्यासाठी ही म्हैस आपल्या पुढच्या दोन पायांवर बसते आणि आपल्या शिंगानी त्या कासवाला पुन्हा सरळ कऱण्यासाठी धडपड करते.

आणखी वाचा : Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

हे कासव असंच पाठीवर पडून राहिले असते तर यात त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. कारण कासवाचा खालचा भाग वरच्या कवचाइतका कठोर नसतो आणि जास्त सूर्यप्रकाशामुळे खालचा भाग गरम होऊन त्याचा जीव धोक्यात आला असता. बराच वेळी आपल्या शिंगानी कासवाला पलटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर ही म्हैस तिच्या प्रयत्नात यशस्वी होते. कासव पुन्हा पलटी होऊन जमिनीवर चालू लागतो.

आणखी वाचा : गाय पाण्यातून चालली होती, अचानक करंट लागून तडफडत जमिनीवर कोसळली आणि मग… पाहा VIRAL VIDEO

भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. सुशांत नंदा हे त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरेच सक्रिय असतात. ते नेमही प्राणी आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक आश्चर्यचकित करणारे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. “प्रत्येकजण दयाळू असू असतो. म्हशीने आपल्या शिंगाने कासवाला उलटवले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘लास्ट डॉग पॅक’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला.

आणखी वाचा : वीज तुमच्या गाडीवर कोसळली तर? काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘खूप जागा आहे, जागा नाही…’ बसमध्ये सीटसाठी दोन जणांच्या भांडणाचा हा VIRAL VIDEO पाहा

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३९ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. तर ५.२ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये शेअर करताना दिसून येत आहेत.