मैत्रीसाठी काही पण, असा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. याचे दाखले आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो. या ठिकाणी आपल्याला माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची मैत्री देखील पाहायला मिळते. अशा एका अनोखा मैत्रीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तुम्हांला कोणी विचारले की सिंह आणि रेड्यात लढाई झाली तर कोण जिंकणार तर तुम्ही सहज सिंह असे म्हणाला. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली आहे. हा व्हिडीओ पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये सिंहीण आणि रेड्याची लढाई झालेली दिसते आहे. मित्राचा जीव वाचवण्यासाठी या व्हिडीओमधल्या रेडा थेट सिंहीणीसोबत भिडला आणि आपल्या शिंगांनी तिला थेट हवेत भिरकावले. हा व्हिडीओ व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “वाह, ही खरी मैत्री”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जमिनीवर बसलेल्या एका जखमी रेड्यावर सिंहीण हल्ला करते आणि आपली शिकार बनवण्याच्या प्रयत्नात असते. नेमकं त्याच वेळी मागुन दुसऱ्या एका रेड्याची धमाकेदार एन्ट्री होते आणि शिकारीसाठी आलेल्या सिंहीणीला आपल्या शिंगावर घेऊन हवेत भिरकावून जमिनीवर धाडकन आपटतो. हा रेडा इतका भडकलेला की पुन्हा सिंहीणीला आपल्या शिंगावर घेऊन दुसऱ्यांदा हवेत भिरकावून जमिनीवर आपटतो. या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने रेड्याने सिंहीणीला धडा शिकवलाय, ते पाहून ही सिंहीणी पुन्हा कधी रेड्याच्या शिकारीसाठी जाईल असं वाटत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बहिणीच्या लग्नात करवल्यांनी केला सरप्राईज डान्स,पाहून तुम्हीही पाहतच रहाल!

एक रेडा जखमी अवस्थेत जमिनीवर तसाच बसलेला दिसून येतोय. आपल्या मित्राच्या जीवावर उठलेल्या सिंहीणीला या रेड्याने चांगलंच उत्तर दिलंय. ज्यावेळी हा रेडा सिंहीणीला शिंगाने हवेत भिरवाकत आपटत होता, त्यावेळी दुसरा रेडा मात्र तसाच जखमी अवस्थेत बसलेला दिसून आला. या व्हिडीओमधल्या रेड्यांची बॉण्डिंग पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. या व्हिडीओमधल्या रेड्यांची मैत्री खरंच पाहण्यासारखी आहे.

आणखी वाचा : काय सांगता? एकाच वेळी अनेक मुलींना करत होता डेट, एका टिकटॉक युजरच्या VIRAL VIDEO मुळे झाला भांडाफोड

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘लाइव्ह’ सुरू असताना महिला पत्रकाराला कारने दिली धडक, अपघातानंतरही रिपोर्टींग सुरूच ठेवलं

हा व्हिडीओ ‘wild_animals_creation’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘बफेलो किंग’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने रेड्याने हल्ला केला त्यापुढे सिंहीणी पूर्णपणे फिकी पडल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडू लागला की, आतापर्यंत या व्हिडीओला २.७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४३.९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’

या व्हिडीओमधल्या रेड्यांची मैत्री पाहून नेटकरी या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काही युजर्सनी रेड्यांच्या मैत्रीचं कौतुक केलंय. तर काही जणांनी सिंहीण आणि रेड्यामध्ये झालेली लढत पहिल्यांदा पाहिली असल्याचं सांगितलंय. अनेक लढतीत सिंह जिंकत असल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. पण या लढतीत सिंहीण हरल्याचं पहिल्यांदा पाहिलं असल्याचं देखील काही युजर्सनी म्हटलंय.