Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा यावर अपघातांचे थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो; तर कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून आपलं भरपूर मनोरंजन होते. यातील काही व्हिडीओ हे हेतूपूर्वक मनोरंजन म्हणून बनवलेले असतात, तर काही व्हिडीओतील घटना अचानक घडलेल्या असतात. पण, अशा गोष्टी सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरतात आणि प्रचंड व्हायरल होतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

घरातील पाळीव प्राण्यांवर मुलांचाही तितकाच जीव असतो. मुलांमधील आणि घरातील गाय, म्हैस या प्राण्यांमधील बाँडिंग अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या या प्राण्यांना चारा, पाणी देणं, अंघोळ घालणं त्यांची काळजी घेणं, याकडे त्यांचं लक्ष असतं. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक म्हैस चक्क त्याच्या मालकाच्या कॉलेजमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कॉलेजमधील वर्गात चक्क एक म्हैस पोहोचली असून तिला वर्गात आलेलं पाहून वर्गातील सर्व जण मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतात. यावेळी एक तरुण म्हशीला पकडून तिला वर्गाबाहेर घेऊन जातो. वर्गाबाहेरही अनेक जण म्हशीला पाहण्यासाठी थांबले होते. म्हैस वर्गाबाहेर येताच सर्व जण मोठमोठ्याने हसून तिला कॉलेजबाहेर घेऊन जातात. या व्हिडीओवर म्हशीला चारा दिला नाही म्हणून ती मालकाला शोधत आल्याचे लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा: ‘ही नवरी असली…’ गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mi_dudh_utpadak या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ३८ हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी लिहिलंय की, “नेमकी जाहिरात होती का reel तेच नाही समजलं, पण मजेशीर व्हिडीओ.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “ती तिचा मालक काय करतोय हे पाहायला आली”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “तिलापण अभ्यास करायचा आहे वाटतं.”