Viral Video: बैल हा एक असा प्राणी आहे की जो खवळला तर कधीही काहीही करू शकतो. अशावेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. आजपर्यंत तुम्ही बैलाच्या हल्ल्याचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. दरम्यान, आताही सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही मजेशीर व्हिडीओ आपण पाहतो. त्यात अनेकदा प्राण्यांचे खूप मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमधून एक वयस्कर महिला जात असून यावेळी एक उधळलेला बैल तिथे येतो आणि त्या महिलेवर हल्ला करतो. या हल्ल्यात सुरुवातीला बैल त्याच्या शिंगाने महिलेला भिंतीकडे ढकलतो. पुढे महिला त्याच्या एका शिंगाला पकडते. यावेळी बैल तिला खाली लोळवतो. महिलेची ही अवस्था पाहून काही लोक गोळा होतात आणि त्या बैलाला पळवून लावण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. त्याचवेळी धाडस करून एक व्यक्ती पुढे येतो आणि बैलाचे शिंग हातात पकडून ठेवतो. यावेळी ती महिला बैलाच्या तावडीतून बाजूला होते, परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे तिला चालता येत नाही. त्यानंतर बैल शिंगाला पकडलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण ती व्यक्ती बैलाला गल्लीतून पळवून लावते.

हेही वाचा: ‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ayuntamientopenafiel या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला लाखो व्ह्युज आणि नव्वद हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

Story img Loader