काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यामुळेच कदाचित त्यांना पाळीव प्राणी असं म्हटलं जातं. परंतु या पाळीव प्राण्यांना जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर झाला तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते घातक ठरू शकतात. मग अशावेळी त्या चवताळलेल्या प्राण्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं. परंतु काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते. हल्ली बैलांच्या जवळ जाऊन त्यांच्यासोबत मस्ती करत खेळ करण्याचे प्रमाण सध्या वाढू लागलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच अशा प्रकारांना आळा घालणं बंधनकारक झालं आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिसळलेल्या बैलाशी पंगा घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं.

स्वत:च्या स्वार्थासाठी काही लोक मुक्या जनावरांचा वापर करुन घेतात. मग अशावेळी त्यांना काही त्रास होतोय का याचा जराही ते विचार करत नाही. या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता मैदानात एका बैल उभा आहे. या बैलाच्या दोन्ही शिंगाना आग लावण्यात आली आहे. याठिकाणी आजूजाबजूला अनेक लोक जमल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान एक तरुण या बैलासमोर उभा राहतो आणि बैलाला हिणवण्याचा प्रयत्न करतो. मग बैलही चवताळतो आणि शिंगांच्या सहाय्याने तरुणाला दूर फेकून देतो. या व्यक्तीला जबदस्त दुखापत झाल्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
tharala tar mag audience upset about new track of the serial
खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: डोंबिवलीकरांचा ट्राफिकवर देसी जुगाड; १ तासाचा प्रवास केला अवघ्या १ मिनिटांत

या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्या व्यक्तीची स्तुती केली तर काहींनी अशा जीवघेण्या स्पर्धे भरवल्या का जातात? असे उपरोधिक टोले लगावले आहेत