प्रत्येक ऑफीसमध्ये जाणारी अथवा काम करणारी व्यक्ती आठवड्यातील सुट्टीची आतुरतेने वाट बघत असते. काही कंपन्यांमध्ये एक दिवस तर काही कंपन्यांमध्ये दोन दिवस आठवड्याची सुट्टी असते. सुट्टी कोणाला आवडत नाही? पण सध्या बर्गर किंगचा कर्मचारी चांगलाच चर्चेत आलाय. कारण या बर्गर किंग कर्मचाऱ्याने एकही सुट्टी न घेता सलग २७ वर्षे कामावर हजर राहून कंपनीत काम केलंय. त्याच्या या कामावर खूश होऊन कंपनीने त्याला अनोखी भेट देखील दिलीय. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय बनलाय.

केविन असं बर्गर किंग कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो अमेरिकेतल्या लास वेगास विमानतळावर असलेल्या बर्गर किंगमध्ये काम करतो. इतरांसारखं त्यालाही सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवणं, फिरणं, ट्रिपला जाणं हे सगळं करता आलं असतं. पण केविनने तसं न करता आपल्या कंपनीसाठी कामात दंग राहत आला आहे. त्याच्या या कर्तव्यपरायणतेचा सन्मान म्हणून बर्गर किंग कंपनीने त्याला एक भेटवस्तू दिलीय. या भेटवस्तूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घोडा आणि कुत्र्यासोबत महिलेने सुरू केली स्केटिंग स्पर्धा, पाहा कोण जिंकतं?

बर्गर किंग कंपनीने या कर्मचाऱ्याला एक गुडी बॅग भेट म्हणून दिलीय. ही भेट पाहून केविनला आश्चर्याचा धक्काच बसला. ही बॅग उघडतानाचा व्हिडीओ शूट करत त्याने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, केविन त्याला मिळालेल्या गुडी बॅगमध्ये काय काय वस्तू मिळालेल्या आहेत, ते दाखवत आहे. कंपनीने त्याला दिलेली ही भेटवस्तू पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकताना दिसतोय. या गुडी बॅगमध्ये त्याला रीसची बॅग, एक स्टारबक्स, रियुझेबल कप, दोन पेन आणि एक चित्रपटाचे तिकीट हे सगळं देण्यात आलंय. गेल्या २७ वर्षात एकही सुट्टी न घेता केविनने केलेल्या कामाची ही पोचपावतीच जणू…

आणखी वाचा : कुत्रा-कुत्रीचं अनोखं लग्न, अत्यंत सुंदर असा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण

यावर बोलताना केविन म्हणाला, “मी खूप आनंदी आहे, मला जे काही मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे, मी खूप काही सहन केले आहे. बर्गर किंग ही एक उत्तम कंपनी आहे, तुम्हाला माहिती आहे, मी गेली २७ वर्षे इथे काम करतोय”. पुढे बोलताना तो म्हणाला, “परंतु बर्‍याच मोठ्या कॉर्पोरेशन्सप्रमाणे, कंपनीचा त्यांच्या कामगारांशी संपर्क तुटला होता. आणि कोविड काळात त्यांनी असे उपक्रम राबवण्यास सुरवात केली.”

आणखी वाचा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL

केविनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र निराशा व्यक्त केली. एका युजरने म्हटले, “ते किमान त्याच्या मुलाला काही मोफत हूपर्स देऊ शकले असते.” दुसर्‍याने लिहिले, “हे खूप अपमानास्पद आहे. त्याला मॅनेजमेंटच्या ट्रॅकवर का ठेवले गेले नाही? २७ वर्षे?” यावर बर्गर किंगचे प्रवक्ते म्हणाले, “बर्गर किंग ब्रँड आणि त्याच्या अनेक फ्रँचायझी देशभरातील हजारो लोकांच्या कामगिरीला ओळखण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी वचनबद्ध आहेत. सर्व आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी समर्पित आहेत. या फ्रॅंचाईसीकडून खूप कमी कालावधीत पॉझिटीव्ह परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम राबण्यात येतो. यात कार्यकाळातील टप्पे आणि आर्थिक पुरस्कार अशा अनेक गोष्टी समाविष्ट असतात. त्यातलाच हा एक भाग आहे.”

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांची निराशा झाली असली तरी तो प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader