Viral Video: दिवाळी हा आनंदाने साजरा करण्याचा सण असला तरीही अनेक जण मोठमोठे फटाके फोडून स्वतःबरोबरच इतरांसाठीही प्रदूषणासह संकटाला आमंत्रण देतात. दिवाळी संपली असली तरीही अजूनही लोकांमधील दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. खरं तर, फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होते; पण तरीही अनेक जण आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवतातच. त्याशिवाय फटाके वाजविताना जीवघेणे स्टंटदेखील करतात, ज्यात बऱ्याचदा काहींना गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात काही तरुण गाडीवर बसून फटाके फोडताना दिसत आहेत. पण यावेळी त्यांच्याबरोबर असं काही होतं, जे पाहून अनेक जण विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एखादा हटके व्हिडीओ टाकून आपल्या लाइक्स आणि व्ह्युज वाढवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आजपर्यंत तुम्ही गाड्यांवर बसून विविध स्टंट करणाऱ्या तरुणांना पाहिलं असेल. असे स्टंट करताना अनेकदा त्यांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही तरुण चक्क गाडीवर बसून फटाके फोडताना दिसत आहेत.

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण फटाके फोडण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. त्यातील दोन तरुण बाईकवर बसतात. यावेळी बाईकवर मागे बसलेला तरुण मागच्या बाजूला तोंड करून फटाक्यांची माळ हातात घेतो. यावेळी आणखी एक जण बाईकवर बसलेल्या तरुणाच्या हातातील माळ पेटवतो. पुढे माळ जोरात फुटते आणि त्यामुळे तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: ‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @amitography या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास ४० दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “असंच पाहिजे अशा लोकांना.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मूर्खपणा आहे.” तिसऱ्यानं लिहिलंय, “असं काही करताना आई-वडिलांचा विचार करता का?” तर, आणखी अनेक युजर्स व्हिडीओवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video burst crackers on the bike netizens expressed anger after seeing the video sap