आपण अनेकदा जनावरांना मारामारी करताना पाहिले असेल. दोन मांजरी तसेच दोन कुत्रे यांच्यातील मारामारी तर अगदीच नेहमीची. बरीच जनावरे तर दुसऱ्या जनावरांचेच भक्ष्य करतात. यामध्ये अनेकदा ते जनावर जखमी होते आणि निपचित पडते. जंगलातील जनावरेही अशीच मारामारी करताना काहीवेळा आपण टीव्हीवर किंवा इंटरनेटवर पाहतो. असाच दोन कांगारुंच्या मारामारीचा व्हिडिओ नुकताच समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दोन कांगारु एकमेकांना मारताना दिसत आहेत. आता हे भांडतायत म्हटल्यावर त्यात कोणाला तरी लागणे आलेच. पण इतके भांडूनही त्यांच्यातील कोणीच जखमी झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडिओ पाहून तुम्ही एखादा गेम पाहत आहात असे तुम्हाला वाटेल मात्र तसे नसून हा व्हिडिओ खरा आहे. पोलिसांच्या इन्फ्रारेड कॅमेरामध्ये कांगारुंचे हे भांडण अतिशय उत्तम पद्धतीने कैद झाले आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील पोलिसांनी हा व्हिडिओ काढला आहे. यामध्ये कांगारु एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांना मारत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ते काहीवेळा उंच उड्याही मारत असल्याचे दिसते. नेटिझन्सनेही या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. हा व्हिडिओ पोलिसांनी रात्रीच्यावेळी हेलिकॉप्टरमधून काढला असल्याचेही म्हटले जात आहे.