वाळवंटातील कडक उन्हात राहणारे उंट तुम्ही चित्रपटात किंवा प्रत्यक्षही पाहिले असतील. तेथील उष्णता आपल्याला नकोशी वाटते, मात्र उंट त्याच वातावरणात वास्तव्य करतात. मग त्यांना याचा किती त्रास होत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जर कधी अशा वातावरणातून ते बर्फाळ प्रदेशात गेले तर? त्यांना तेथील थंडी अनुभवताना कसे वाटेल? हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक उंट बर्फाळ प्रदेशात आल्याचे दिसत आहे. हा उंट पहिल्यांदाच बर्फाचा अनुभव घेत असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. बर्फाचा अनुभव घेताच हा उंट आनंदाने उड्या मारू लागतो, पाहा त्याची प्रतिक्रिया.

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

व्हायरल व्हिडीओ:

बर्फ पाहून आणि थंड वातावरणाचा अनुभव घेऊन हा उंट आनंदी झाल्याचे दिसत आहे. या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video camel goes in snowy region for the first time his reaction wins internet pns