Viral Video Shows Magical Moments Between Elephant & Mahout : पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. गारेगार हवा, धो-धो पडणारा पाऊस तर सगळीकडे मातीचा सुगंध दरवळताना दिसतो. या सगळ्या गोष्टी पाहून मन प्रसन्न होऊन जाते. त्यामुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही पावसात भिजायला प्रचंड आवडते; जे आजवर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओतून पाहिलं असेल. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये हत्ती कॅम्पमधील एक नयनरम्य दृश्य कॅमेरात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. कारण भरपावसात हत्ती व माहूत पावसाळ्यात फेरफटका मारायला निघाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूमधील आहे, जो आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. तामिळनाडूच्या अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील कोझिकामुथी एलिफंट कॅम्पमध्ये हत्ती व माहूत पावसाळ्यात फेरफटका मारताना दिसत आहेत. माहूत हा हत्ती या प्राण्याचा स्वार, प्रशिक्षक किंवा रक्षक असतो. तर माहूत हातात छत्री पकडून, हिरव्यागार नयनरम्य कॅम्पमध्ये हत्तीबरोबर पावसाचा आनंद लुटत आहे. माहूत व हत्तीमधील हा हृदयस्पर्शी क्षण एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…पाणावलेले डोळे, बाप्पाची मूर्ती अन्… रिक्षाचालकाला ‘तिने’ दिलं गुलाबाचे फुल; VIRAL VIDEO तील त्याची ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जोरदार पाऊस सुरू आहे. पण, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हत्ती व त्याचा जोडीदार माहूत फेरफटका मारायला निघाले आहेत. याचबरोबर हातात छत्री घेऊन माहूत हत्तीच्या पाठीवर मायेने हात फिरवतानाही दिसत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहून आयएएस अधिकारी सुप्रिया साहू व्हिडीओचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकल्या नाही. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘तामिळनाडूतील अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील कोझिकामुथी हत्ती कॅम्पमध्ये भरपावसात माहूत व त्याचा हत्ती यांच्यातील जादुई क्षण; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्या अधिकृत @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा २७ सेकंदाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ वन्यजीव छायाचित्रकार धनू परण यांनी रेकॉर्ड केला आहे, जो वन्यजीवप्रेमींच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, ‘असे दृश्य फक्त चित्रपटातून दिसते, जे तुम्हाला आज येथे पाहायला मिळते आहे’; तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘माहूत आणि हत्ती यांच्यातील नातं अविश्वसनीय आहे.’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader