Viral Video: लहान मुलं कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही. आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना या चिमुरड्या मुलांना नसते. त्यामुळेच अनेकदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. अनेकदा पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची नजर चुकवून मुलं असं काहीतरी करतात, ज्यामुळे अनेकदा त्यांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. आजवर असे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकला चक्क एकटाच लिफ्टमध्ये जाताना दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये एका चिमुकला चक्क एकटाच लिफ्टमध्ये शिरल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकला आईबरोबर लिफ्टजवळ येतो; परंतु त्याची आई गप्पा मारत असल्याची संधी साधून, तो तिच्या नकळत कुतूहलापोटी एकटाच लिफ्टमध्ये शिरतो. त्यानंतर लिफ्ट सुरू झाल्यावर तो चिमुकला लिफ्टमधील बटण दाबतो आणि रडायला सुरुवात करतो. लिफ्ट तिसाव्या मजल्यावरून सरळ ग्राऊंड फ्लोअरला उघडते. यावेळी दरवाजा उघडतो; पण समोर कोणीही नसल्याने तो चिमुकला लिफ्टमधून बाहेर पडत नाही. मात्र, लिफ्टचा दरवाजा बंद होणार इतक्यात तो दरवाजाजवळ बाहेर उतरण्यासाठी जातो; पण दरवाजा बंद होत असल्याने तो पुन्हा मागे येतो. ते दृश्य म्हणजे या व्हिडीओतील काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आहे. त्यानंतर लिफ्ट पुन्हा वर जाण्यासाठी सुरू होते, असे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. आई-वडिलांच्या हलगर्जीपणामुळे मुले असे काहीतरी करून स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangram_dhanve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “ही आई नाही; मूर्ख बाई आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आपल्या मुलांवर लक्ष द्या, काळजी घ्या त्यांची प्लीज.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “चूक त्या मुलाची काहीच नाही; चूक तर तिच्या आईची आहे, जी बाळाला मोकळे सोडून गप्पा मारत बसली आहे.”