रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा वाहतूकीचे नियम भंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर कधी रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात होत असतात. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक म्हणजे स्पीडब्रेकर लावले जातात. पण स्पिड ब्रेकर आता लोकांचा जीव धोक्यात टाकत आहे. सध्या गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर एका स्पीड ब्रेकरवर वाहने आदळून हवेत उडत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऑटोमोटिव्ह प्लॅटफॉर्म 91Wheelsचे संपादक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनी पुनिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी हे ठिकाणी R26 ढाब्याच्यासमोर सेंट्रम प्लाझाजवळचे असल्याचे सांगितले.
“अरे! गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर नव्याने बनवलेल्याया स्पीडब्रेकरवर हा प्रकार घडल्याचे दिसते! मी एका ग्रुपवर हा व्हिडिओ पाहिला. मिळालं. धिक्कार! गुरुग्राममधील कोणी याची पुष्टी करू शकेल का,?” असे पुनियाने व्हिडिओ शेअर करताना विचारले.
छोट्या क्लिपमध्ये वाहने स्पीडब्रेकरवर आदळून चक्क काही क्षण हवेत तरंगत असल्याचे दिसते आणि नंतर ते थेट जमिनीवर आदळते.
हेही वाचा –प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच
येथे व्हिडिओ पहा:
हेही वाचा –“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्वरित या स्थानाची पुष्टी केली.
एक जण म्हणाला की, शुक्रवारी मी ऑफिसमधून येत असताना लक्षात आले. हे सेंट्रम प्लाझा इमारतीच्या नंतरचे स्पीडब्रेकर आहे,” तर दुसऱ्याने जोडले, “अचूक स्थान: सेंट्रम प्लाझा इमारतीनंतर, HR26 ढाब्यासमोर.”
अनेक वापरकर्त्यांनी रस्त्याच्या डिझाईनकडे लक्ष वेधले कारण तिथे स्पिड ब्रेकर असण्याची आवश्यकता नाही.
“यामागील हेतू खरा आहे कारण यू-टर्नमुळे लेन अरुंद होण्याआधी वेग कमी होण्यास मदत करणे हा त्याचा उद्देश आहे, परंतु त्यावर कोणत्याही खुणा नसल्यामुळे गाड्या हवेत उडताना दिसत आहे. भारतीय संघाच्या कामगिरीप्रमाणेच चांगल्या अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे असे एकाने म्हटले.
दुसऱ्या वापरकर्त्याने जोडले: “गोल्फ कोर्स रोड ज्या प्रकारे बनविला गेला आहे तो एक उद्देश आहे, त्यावर कोणतेही स्पीड ब्रेकर नसावेत. हे वेडे आहे.”
या व्हिडिओमुळे केवळ रस्ता सुरक्षा उपायांच्या गरजेवरच नव्हे तर वाहतूक व्यवस्थापनाच्या चुकीच्या हाताळणीवरही चर्चा सुरु झाली