Cat Baby Shower: हल्ली लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. लोकांच्या डोक्यात कधी कुठल्या कल्पना येतील याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपल्या डोळ्यांसमोर येतात, ज्यामध्ये काही लोक त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन गोष्टी करताना दिसतात, जे पाहून नेटकरीही अवाक् होतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक महिला तिच्या मांजरीबरोबर असं काहीतरी करताना दिसतेय जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मांजर असो किंवा श्वान, या दोन्ही प्राण्यांना अनेक जण खूप जीव लावतात, त्यांचा सांभाळ करतात; घरातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यांना महत्त्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. त्यांचे वाढदिवस साजरे करतात, त्यांचे खूप लाड करतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये मांजरीची मालकीण चक्क मांजरीचे डोहाळे पुरवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये पाळीव मांजरीला सुंदर सजवण्यात आलं असून यावेळी तिच्या हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली, गळ्यात दागिने, केसात फुलं, अंगाभोवती निळ्या रंगाची ओढणी गुंडाळण्यात आली आहे. यावेळी तिला फुलांनी सजवलेल्या ठिकाणी बसवण्यात आलं असून तिचं औक्षण केलं जात आहे. त्यानंतर तिच्या पुढ्यात पेढा की जिलेबी निवडण्यासाठी फुलांनी सजवलेलं ताट ठेवण्यात येतं, मांजरीच्या डोहाळे जेवणाचा हा सुंदर व्हिडीओ पाहून अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आयुष्यात एकतरी मित्र असा हवा…’ बिबट्याने मित्राला पकडल्यावर दुसऱ्याने वापरली युक्ती… VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @purple_thepersian_9 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “खूप नशिबवान आहे माऊ, इतकं कौतुकाने जपणाऱ्या कुटुंबाला खरचं सलाम”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती गोड आहे, मी नजर काढली रील बघता बघता.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “सोबत बोका असता तर अजून भारी झाली असती रील.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “हौसेला मोल नाही.”