Viral Video: एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं रे झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यावर लोकांकडून अनेक रिल्स, व्हिडीओ बनविले जातात. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना रिल्स बनविल्याशिवाय राहवत नाही. सध्या गुलाबी साडी गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कोणती व्यक्ती डान्स करत नसून चक्क एक मांजर या गाण्यावर नटलेली दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कुत्रा असो किंवा मांजर या दोन्ही प्राण्यांना अनेक लोक जीव लावतात, त्यांना सांभाळतात. घरातील इतरांइतकेच महत्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. काही जण तर या प्राण्यांना झोपण्यासाठी स्पेशल बेडदेखील आणतात. त्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कधी त्यांना त्यांच्या आवडीचे कार्टूनदेखील दाखवतात. हल्ली अनेक जण आपल्या प्राण्यांसोबत रीलदेखील बनवताना दिसतात. आतादेखील एका व्यक्तीने मांजरीसोबत रील बनवला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
Shocking video The Viral Girl Monalisa Breaks Youtubers Camera Mahakumbh 2025
“प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली?” महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात गुलाबी साडी हे गाणं लावण्यात आलं आहे. यावेळी एका मांजरीला तिच्या मालकिणीने एका ठिकाणी बसवले आहे. यावेळी मांजरीला सुरुवातीला ती टिकली लावते. त्यानंतर तिला मांग टिक्कादेखील लावते आणि नंतर तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाची ओढणी ठेवते. यावेळी ती मांजरदेखील गोड एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “आमची नखरेवाली असं लिहिलं आहे,” या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pawni_gupta_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीस मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “ही सिंगल आहे का?”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “राजकुमारी बिल्लूमती”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “ही मुलींपेक्षाही खूप सुंदर आहे”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूप गोड आहे ही.”

हेही वाचा: याला म्हणतात बदला; ‘काळू… काळू…’ म्हटलं म्हणून कुत्र्याला आला राग; केलं असं काही… VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या होत्या. हे रिल्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाले होते. त्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनविली होती.

Story img Loader