सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या व्हिडीओतील मांजरीची हालचाल पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणू शकाल की कलियुगात सर्व काही शक्य आहे. काही मांजरी पडद्याआडून त्यांच्या समोर सुरू असलेले भांडण पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये मांजर शांतपणे काय पाहत असतात हे समजत नाही. नंतर व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसा कॅमेरा पुढे सरकतो, तर दुसरी मांजर दारात दोन्ही पायांवर उभी असते आणि शेजारच्या मांजरींकडे टक लावून पाहत असल्याच यामधून समजून येते. यावरून दारात उभ्या असलेल्या मांजरीच्या घरात कशावरून तरी भांडण झाल्याचे स्पष्ट होते. भांडणाचा आवाज शेजारी पोहचला की शेजारच्या मांजरी भांडण ऐकायला त्यांच्या व्हरांड्यात येतात.
त्याच वेळी शेजारच्या मांजरी शांतपणे त्यांच्या जागी थांबतात. त्याच वेळी, पहिली मांजर शेजारच्या मांजरींनकडे हळूच डोकावून पाहत असते. हे दृश्य पाहायला खूप गोंडस आहे. अनेकदा अशी परिस्थिती परिसरात होणार्या शेजारणीच्या भांडणानंतरही राहते. तेव्हा परिसरातील लोकं सुद्धा इच्छा असूनही हस्तक्षेप करू शकत नाहीत. या दरम्यान लोकं प्रेक्षक म्हणून समोर सुरू असलेली भांडण पाहत असतात. असाच काही प्रकार यावेळी या मांजरींनी केला आहे.
हा व्हिडिओ सेवा अधिकाऱ्याने केला शेअर
हा व्हिडिओ भारतीय सेवा अधिकारी रुपिन शर्मा आयपीएस यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. दरम्यान हा व्हायरल केलेल्या व्हिडीओला काही वेळातच हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर काही लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि कमेंटही केल्या आहेत.