Viral Video of Cat vs Snake Battle : साप म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापाला पाहून कोणालाही सहज वाटते. सहसा साप आणि मुगूंस एकमेकांवर हल्ला करतात. पण तुम्ही कधी एखाद्या मांजर आणि सापाच्या लढतीचा व्हिडिओ पाहिला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या सापाचा एक मांजर पाठलाग करत आहे आणि अचानक साप मांजरावर झडप घालून हल्ला करते आणि पुढे जे काही घडते ते पाहून नेटकरी चक्रावले आहे.

या व्हिडिओमध्ये मांजर आणि सापाच्या लढाईला एक अनपेक्षित वळण आले आहे. व्हिडिओमध्ये मांजर शांतपणे सापाच्या मागे जात असल्याचे दिसते दरम्यान साप अचानक मागे वळून मांजरीवर झडप घालतो आणि दोघांमध्ये लढाई सुरू होते. या दोन्ही प्राण्यांमधील नाट्यमय संघर्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण पुढे जे घडले ते पाहून हसू आवरणार नाही.

साप आणि मांजराची जुंपली भयंकर लढाई (Cat Vs Snake Battle Video)

व्हिडिओची सुरुवात एका मांजरीने एका कंपाउंडमध्ये साप सरपटणाऱ्या मागे हळू हळू जाताना दिसत आहे. भिंतीकडे सरपटणाऱ्या सापाने अचानक आपली दिशा बदलली आणि मांजरीवर आक्रमकपणे हल्ला केला. मांजरही प्रतिकार कर सापाला पंज्याने फटके मारताना दिसत आहे. मांजर बचावासाठी स्वत:चा बचाव करत आहे.

साप आणि मांजराची लढाईचा अनपेक्षित शेवट (Shocking Ending to Cat Snake Battle)

थोड्या वेळासाठी तीव्रतेने सुरु असलेली लढाई पाहून नेटकरी श्वास रोखून पाहात आहे. काहीतरी भयानक घडण्याची अपेक्षा करत असतानाच, घटनेने अनपेक्षित वळण घेतले. कारण मांजर आणि साप दोघेही शांत झाले आणि दोघांनी अचानक लढणे थांबवले. एवढंच नाही तर एकमेकांच्या शेजारी बसून ते विश्रांती घेताना दिसत आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या लढाईचा शेवट असाच झाला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.

Legendary battle caught on camera
byu/nottatnight inKerala

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ( Netizens’ reactions)

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. दोघांमधील लढाईतील मधील तणाव लगेचच कमी झाला कारण दोघांनीही भांडण सुरू ठेवण्याऐवजी शांत राहण्याचा निर्णय घेतला. या आश्चर्यकारक शेवटामुळे नेटकरी बुचकळ्यात पडले.

Story img Loader