पाकिस्तान आणि जगातील इतर देशातील काही मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषत: पाकिस्तानचे काही व्हिडीओ हे इतके मजेदार असतात की ते पाहून लोक खळखळून हसतात. पाकिस्तान खरोखर एक अजब देश आहे. इथं कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या एका मजेदार कारणानं पाकिस्तान चर्चेत आहे. पाकिस्ताननं चक्क ‘चप्पल मार मशीन’चा शोध लावलाय. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला विचित्र वाटेल. पण हे खरंय. या चप्पल मार मशीनमुळे पाकिस्तान प्रचंड चर्चेत आलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओवर लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया देखील वाचण्यासारख्या आहेत.

लोकशाही मूल्ये आणि लोकशाही प्रक्रिया, संकेत यांची वासलात कशी लावता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणून पाकिस्तानातल्या सध्याच्या घडामोडींकडे बोट दाखवता येतं. इथली प्रत्येक सकाळ ही एखाद्या निषेधाच्या आंदोलनानेच सुरू होत असते. मग अशा आंदोलन कधी एखाद्या नेत्यांच्या प्रतिमांना चप्पल मारो आंदोलन हे तर इथे नित्याचंच झालंय. अशा आंदोलनाचा भार हलका करण्यासाठी पाकिस्ताननं आता तर थेट चप्पल मार मशीनचाच शोध लावलाय. नुकत्याच झालेल्या आंदोलनांमध्ये आंदोलकांनी आपले ओझे कमी करण्यासाठी ‘चप्पल मार मशीन’चा वापर केला आहे. लोकांनी या मशीनला ‘ऑटोमॅटिक चप्पल मार मशीन’ असे नावही दिले आहे. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रॅफिक सिग्नलवर लेझर तलवारी विकणाऱ्या या व्यक्तीचं टॅलेंट पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!

या चप्पल मार मशीनने आपोआप चप्पल मारली जाते. ज्या प्रतिमांना चप्पल मारायची असेल त्यासमोर ही मशीन नेऊन नुसती उभी केली तरी ती तिचं काम चोख करते. ही भन्नाट चप्पल मार मशीन सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आली आहे. लोकांना ही मशीन मात्र फार आवडली आहे. मेजर गौरव आर्य यांनी majorgauravarya नावाच्या ट्विटर अकाउंटवरून या मशीनचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘पाकिस्तानमधील स्टार्ट-अप इकोसिस्टम खरोखरच जुनी आहे. ही #AutomaticLaanatMachine शुद्ध भूमीचा नवा शोध आहे.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : १५ ऑगस्टच्या दिवशी पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांचा नागीण डान्स, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : एका तुटलेल्या पुलावरून पठ्ठ्यानं केली रॉयल एनफिल्डची स्वारी, VIRAL VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो लोक तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर आवर्जून शेअर करू लागले आहेत. तसंच व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील शेअर करू लागले आहेत. एका यूजरने लिहिले की, हे खरोखरंच छान आहे. आणखी एका युजरने लिहिले, ‘अप्रतिम ऑटोमेशन! कोण म्हणतं पाकिस्तान हा तांत्रिकदृष्ट्या विकसित देश नाही?’ दुसर्‍याने लिहिले, ‘ऑटोमॅटिक लानत मशीन… इनोव्हेशन इज नेक्स्ट लेव्हल.’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘हा पाकिस्तानचा मशीन लर्निंगचा नवीन मार्ग आहे.’

Story img Loader