Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, हे वाक्य अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. पण, आताच्या काळात हे वाक्य फार कमी जणांच्या लव्ह स्टोरीला सूट होतं, कारण हल्ली प्रेमाच्या नावाखाली अनेक चुकीच्या घटना घडताना आपण पाहतो. त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यावर जीवापाड प्रेम करत असलेल्या व्यक्तीला धोका देणे. आजकाल गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीने एकमेकांचा विश्वासघात केलेल्या अनेक घटना नेहमीच समोर येतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका तरुणीला तिच्या सहा प्रियकरांनी नव्या बॉयफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यापैकी काही व्हिडीओ हे फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात, तर काही व्हिडीओतील घटना खऱ्या असतात, ज्या अनेकदा आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अगदी खरा असल्याचं म्हटलं जातंय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर कॅफेमध्ये बसली असून यावेळी अचानक तिथे तिचे सहा बॉयफ्रेंड येतात. या व्हिडीओच्या सुरुवातीला तिच्याबरोबर बसलेला बॉयफ्रेंड डोळे बंद करतो किंवा डोळ्यांवर हात ठेवतो त्यानंतर एकामागे एक असे एकूण सहा तरुण तिथे येतात. त्यातील एक जण तिच्या दुसऱ्या बाजूला बसतो, तर इतर तिच्या समोर उभे राहतात. त्यानंतर तिचे डोळ्यांवर हात ठेवणारा बॉयफ्रेंड तिच्या डोळ्यांवरचा हात काढून बाजूला उभा राहतो. तरुणी काहीतरी स्पेशल सरप्राईज असेल असं समजून वर बघते. पण, यावेळी तिचे तब्बल सहा बॉयफ्रेंड तिला दिसतात. यातील काही जण तिच्याकडे रागाने बघतात तर काही जण तिला जाब विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने हे तरुण या मुलीचे बॉयफ्रेंड असून तरुणी एकाचवेळी सगळ्यांना डेट करत असल्याचे लिहिले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @delhi_boyyss या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एकाने लिहिलंय की, “बरं झालं या सगळ्या मुलांना समजलं.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पैशांसाठी काही मुली काय काय करतात.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “किती नालायक मुलगी आहे,” तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिच्यावर संस्कार कमी पडले वाटतं.”