सांभर आणि चटणीसह कुरकुरीत मसाला डोसाचा आस्वाद घेणे हा एक निखळ आनंद आहे. हे नाकारता येणार नाही की, ते तात्काळ आत्मा तसेच जीभेलाही तृप्त करते. पण जर आम्ही तुम्हाला सांगतो की व्हायरल फिव्हर किंवा विचित्र फ्यूजनच्या कचट्यात तुमचा आवडता डोसा देखील सापडला आहे तर? होय आता विचित्र फ्युजन फुडच्या यादीमध्ये तुमचा आवडता डोसा देखील आला आहे. यावेळी डोसाप्रेमींना चक्रावून टाकणारा अगदी विचित्र मटका डोसा तयार केला आहे. नक्की काय आहे हा पदार्थ आणि नेटकरी का आहेत नाराज? चला जाणून घेऊ या.
विचित्र व्हायरल फ्यूजन
फ्युजनच्या नावाखाली आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाची मुळ चव नष्ट करणे हा आजकाल नवा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे देशभरातील खाद्यप्रेमींना नाराज होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील फ्रूट चहा, मोमो आईस्क्रीम, मॅगीचे भजी, फंटा ऑम्लेट असे अनेक विचित्र फुड फ्युजन समोर आले आहेत. आता या यादीमध्ये चिझी मटका डोसा हा नवा फूड फ्यूजन देखील दिसणार आहे आणि दक्षिण भारतीय पदार्थांच्या मुळ चव आणि स्वाद नष्ट करणार आहे असे दिसते.
व्हायरल मटका डोसाचा हा व्हायरल व्हिडिओ @DeepakPrabhu या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला आहे ज्याने मटका डोसा सुरवातीपासून तयार केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओला 68.6K पेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
कसा तयार केला हा मटका डोसा
मटका डोसा कसा तयार केला हे येथे आहे: प्रथम, डोसा तव्यात शिमला मिरची, पनीर आणि टोमॅटो सॉस, सोया सॉस, मसाले टाकून नंतर या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. डोसा तव्यावर पीठ ओतून डोसा पसरवल्यानंतर त्यात सॉस, चीज, मेयोनिझ, मसाले आणि थोडे पाणी घालून भाज्या टाकल्या जातात. स्टफिंग शिजवल्यानंतर, ते मटकामध्ये टाकले जाते, ज्यावर किसलेले चीज आधीच टाकलेले आहे. डोसा किसलेले चीज, चिरलेली कोथिंबीर, मेओनिझ घालून त्याचा शंकू आकार तयार करुन मटक्यावर ठेवला जातो.
बघताक्षणी ताजे टोमॅटो कसे ओळखाल? कीड किंवा खराब टोमॅटोच्या ‘या’ पाच खुणा नीट ओळखा
सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मेओनिझ यांचे हे विचित्र मिश्रण पाहून या दक्षिण भारतीय स्वादिष्ट पदार्थाच्या वाट लावल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. खरं तर, नेटकऱ्यांनी काही विनोदी कमेंट्स करुन या फुड फ्युजनसाठी त्यांची नापसंती व्यक्त केली. जसे की एका वापरकर्त्याने पोस्ट केले ‘मी एफआयआर कुठे नोंदवू?’ दुसर्या वापरकर्त्याने ‘जगाचा अंत’ अशी कमेंट केली आहे.
तुम्हाला हा व्हायरल मटका डोसा खायला आवडेल का?