Butter Chicken Ice cream Viral Video: आपण आजवर सोशल मीडियावर खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. कधी मातीच्या भांड्यात, कधी पितळेच्या भांड्यात कधी अगदी भातुकलीच्या खेळासारखे जेवण बनवतनाचे व्हिडीओ पाहणे सगळ्यांनाच आवडते. पण काही जण प्रयोगाच्या नावाखाली अत्यंत टेस्टी पदार्थांची अशी काही माती करतात की जे बघून जॉली LLB मधील अर्शद वारसीचा “कौन हे ये लोग, कहाँ से आते है” हा एक डायलॉगच पटकन आठवतो. असाच एक नवा विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून चिकनप्रेमी तर इतके भडकलेत की हा प्रयोग करणाऱ्या शेफची त्यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. तर नेमका हा व्हिडीओ आहे काय? चला पाहुयात…

तर व्हायरल व्हिडीओ हा एका आईस्क्रीमचा आहे. तुम्ही म्हणाल आईस्क्रीम मध्ये कोणीही जास्तीत जास्त काय बिघडवू शकतं? मुळात याआधी पाणीपुरी आईस्क्रीम, मिरची आईस्क्रीम असे प्रकार लोकांना इतके आवडले होते त्यामुळे आता कोणताच प्रयोग धक्कादायक ठरणार नाही, जर असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा हा व्हिडीओ आधी पाहाच..

सोशल मीडियावर सध्या बटर चिकन आईस्क्रीम तुफान व्हायरल होत आहे. @Foodvoodindia या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल १ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. तुम्ही यात पाहू शकता की शेफ स्वतः बटर चिकन आईस्क्रीमचा एक स्कुप काढून ग्राहकांना सर्व्ह करत आहे. हा प्रकार काय कमी होता म्हणून त्याने वर टॉपींगसाठी मिंट म्हणजेच पुदिन्याची चटणी सुद्धा घातली आहे. आधी वाचूनच अंगावर शिसारी आली असेल ना?

खरं सांगायचं तर यात शेफने जसं पदार्थ सर्व्ह केलाय ती सजावटीची पद्धत खूप सुंदर आहे पण मूळ पदार्थाचं इतका विचित्र आहे की याचं कौतुक करण्याचा नेटकऱ्यांचा अजिबात मूड नाही.

बटर चिकन आईस्क्रीम

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यावर कमेंट करून नाही, कृपा करा पण असले प्रयोग बंद करा अशी मागणी वजा विनंती केली आहे.तर काहींनी त्या बटर चिकन आणि आईस्क्रीमने तुमचं काय बिघडवलं होतं असा प्रश्न केला आहे. तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला आणि तुम्ही असं काही ट्राय कराल का? कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader